शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एकाच विद्यार्थिनीला दुसऱ्यांदा शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 12:33 IST

अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून २०१७-१८ मध्ये देय असलेल्या शिष्यवृत्तीची रक्कम खात्यावर जमा करताना दोन विद्यार्थिंनीऐवजी एकीच्या नावावर दुसºयांदा देण्यात आली.

अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून २०१७-१८ मध्ये देय असलेल्या शिष्यवृत्तीची रक्कम खात्यावर जमा करताना दोन विद्यार्थिंनीऐवजी एकीच्या नावावर दुसºयांदा देण्यात आली. मार्च २०१८ मध्ये घडलेल्या या प्रकाराने एक विद्यार्थिनी शिष्यवृत्तीपासून अद्यापही वंचित आहे. समाजकल्याण विभागात डुलक्या घेणाºया अधिकारी-कर्मचाºयांनी विद्यार्थिनीचे पालक चौकशीसाठी गेले असता त्यांचीच कौटुंबिक चौकशी करण्याची भाषाही वापरली आहे.शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा देण्यासाठी २०१६-१७ पासून स्वाधार योजना सुरू झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. अकोला जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करताना समाजकल्याण विभागाने डुलक्या घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. एका लाभार्थीला ४५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. ती रक्कम एकाच विद्यार्थिनीच्या नावावर दोन वेळा म्हणजे ९० हजार रुपये जमा करण्यात आली. एंजल आॅफ मर्सी इस्टिट्युट आॅफ नर्सिंग सायन्स येथे प्रशिक्षण घेणाºया राजश्री राजेश वानखडे या विद्यार्थिनीची ४५ हजार रुपये रक्कम दुसºया विद्यार्थिनीच्या नावावर टाकली. ती मात्र अद्यापही शिष्यवृत्तीपासून वंचित आहे. याबाबत चौकशीसाठी पालकांनी सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयात धाव घेतली. त्यावेळी त्यांना तुम्ही पात्र लाभार्थी आहात की नाही, याचीच चौकशी करावी लागेल, असा दम देण्यास अधिकारी विसरले नाहीत. 

चूक करणाºयाला घातले पाठिशीस्वाधार योजनेची रक्कम विद्यार्थिनीच्या नावे जमा करण्याची जबाबदारी असलेल्या वसतिगृह अधीक्षक चेडे यांना या प्रकरणात पाठीशी घातले जात आहे. सहा महिन्यांपासून या चुकीची दुरुस्ती करण्याचीही तसदी समाजकल्याण विभागाने घेतली नाही. दाद मागायला गेलेल्या पालकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यातून चूक करणाºया संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात आला.

विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना नोटीसयाप्रकरणी श्री नथमल गोयनका विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना नोटीस देत मनीषा दिवाकर इंगळे या विद्यार्थिनीकडून ४५ हजार रुपये वसूल करून ती धनाकर्षाद्वारे समाजकल्याण कार्यालयात जमा करण्याची नोटीस सहायक आयुक्तांनी दिली. या प्रक्रियेत सोयीस्करपणे ही गंभीर चूक करणाºया संबंधित कर्मचाºयांना बाजूला ठेवण्यात आले आहे. त्यांना नोटीस देत विचारणा करण्याचेही धाडस सहायक आयुक्तांनी दाखवले नाही, हे विशेष.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्ती