शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट काँक्रिट मार्ग पूर्ण होण्याआधीच दोन रस्ते उखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:26 IST

अकोला : शहरातील सिमेंट काँक्रिट मार्ग अजून पुढच्या टोकापर्यंत पूर्णदेखील झाले नाही तोच, दोन मार्ग अक्षरश: उखडले आहेत.

अकोला : शहरातील सिमेंट काँक्रिट मार्ग अजून पुढच्या टोकापर्यंत पूर्णदेखील झाले नाही तोच, दोन मार्ग अक्षरश: उखडले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून शासनाने शहरात अनेक मार्गांची निर्मिती केली; मात्र भ्रष्ट अधिकारी-कंत्राटदारांमुळे शासनाचा कोट्यवधींचा निधी पाण्यात गेला आहे. सुरुवातीच्या पावसाने सार्वजनिक बांधकाम आणि कंत्राटदारांचे पितळे उघडे पाडल्याने अकोलेकरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जिल्हा प्रशासनाने शहरातील आठ रस्त्यांचे सोशल आॅडिट केले होते. त्याप्रकरणी पुढील कारवाई अकोला महापालिकेला करायची होती; मात्र महापालिका प्रशासनने अद्याप चुप्पी साधलेली आहे. जनतेच्या रकमेचा दुरुपयोग करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.मागील दोन-अडीच वर्षांपासून अकोल्यात सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे बांधकाम धूमधडाक्यात सुरू झाले. शहरात एकाच वेळी अनेक रस्त्यांचे काम सुरू झाल्याने अकोलेकरांमध्ये उत्साह होता; मात्र हा उत्साह फार काळ टिकला नाही. शहरातील सिटी कोतवाली ते शिवाजी पार्क आणि नेहरू पार्क ते तुकाराम चौक या दोन प्रमुख मार्गांचे बांधकाम अद्याप पूर्णदेखील झाले नाही, तर रस्ता उखडण्यास सुरुवात झाली आहे. पैकी सर्वात निकृष्ट म्हणून सिटी कोतवाली ते शिवाजी पार्कचा टिळक मार्ग सिद्ध होत आहे. या मार्गाचे दोन तुकडे मध्येच सोडले असून, चौपदरीऐवजी अनेक ठिकाणी तीन पदरी मार्ग तयार झाला आहे. गवळीपुरा-मनकर्णा प्लॉटकडे जाणारा मार्ग अजूनही तीन पदरीच झाला आहे. तसेच मानेक टॉकीजसमोरच्या ६० फूट अंतराचा मार्ग अक्षरश: वाहून गेला आहे. अग्रसेन चौक ते दुर्गा चौक काँक्रिट मार्गावरील कारमेल हायस्कूलसमोर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्याचप्रमाणे महेंद्र काळे यांच्या हास्पिटलसमोर आणि जिल्हा स्त्री रुग्णालयासमोरच्या मार्गाची स्थिती केविलवाणी झाली आहे. अनेक वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या रस्त्यांची अवस्था आणि अलीकडेच बांधलेल्या रस्त्यांची तुलना केली तर जुने रस्ते अद्यापही शाबूत असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे टावर चौकापासून पुढे जाणाºया स्कायलार्क हॉटेलसमोर मोठमोठे भगदाड पडले आहेत. या मार्गाची ठिकठिकाणी चाळणी झाली आहे. सोबतच हेड पोस्ट आॅफिस ते सिव्हिल लाइन मार्गावर बीएसएनएल कार्यालयासमोरही तीच अवस्था आहे. सीताबाई आर्ट महाविद्यालयासमोरही मार्ग उखडला आहे. नेहरू पार्क ते गोरक्षणकडे जाणाºया मार्गाच्या भेगा सुटल्याने रस्त्याला उखडण्यास सुरुवात झाली आहे. बाबा गावंडे यांच्या घरासमोर आणि सहकार नगराजवळ खड्डे पडले आहेत.

 महापालिका प्रशासनाची चुप्पी का?

सोशल आॅडिट झालेल्या आठ रस्त्यांमध्ये निकृष्टतेचे अनेक दाखले समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाने कारवाई केल्यानंतर कारवाईचा चेंडू महापालिकेच्या कोर्टात आहे. जानेवारीत सभा घेऊन कारवाईची भाषा करणाºया महापालिकेने अद्याप एकही पाऊल त्या दिशेने टाकलेले नाही. त्यामुळे अकोलेकरांमध्ये महापालिका प्रशासनाबाबतही रोष व्यक्त होत आहे.

सार्वजनिक बांधकाम  विभागाकडून पुन्हा पाहणी

सुरुवातीच्याच पावसाने बांधकाम विभाग आणि कंत्राटदारांचे पितळे उघडे पडले. अकोलेकर शिव्याशाप देत असले तरी, अकोला सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप पाहिजे तशी दखल घेतलेली नाही. याबाबत अकोला विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर धिवरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पुन्हा पाहणी करू, असे सांगितले. संपूर्ण अकोलेकर उघड्या डोळ्यांनी दुर्दशा पाहत असताना, सार्वजनिक बांधकाम विभाग काय नव्याने पाहणी करणार आहे, असा प्रश्न सर्वसामान्य अकोलेकर करीत आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग