अकोला: पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सीताराम सोनवणे व विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक संजय रामचंद्र खांडेकर यांची बदली करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांची मुंबई येथे, तर विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय खांडेकर यांची नागपूर शहर (वाहतूक) शाखेत बदली करण्यात आली. खांडेकर यांच्या जागेवर नागपूर येथून देवराव चिंतामण खंडेराव यांची बदली झाली आहे. यासोबतच सहायक पोलीस निरीक्षकांच्यासुद्धा बदल्या करण्यात आल्या आहेत. अकोल्यातील सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार मारुती कोल्हाळ यांची सोलापूर शहरात बदली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मयूर बाबूलाल चौरसिया यांची नागपूर शहर, तर राखीव पोलीस उपनिरीक्षक महादेव मधुकर खंडारे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र (अकोला) येथून मुंबई येथील रिक्त पदावर बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या गुरुवारी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या आदेशावरून करण्यात आल्या आहेत.
अकोल्यातील दोन पोलीस निरीक्षकांची बदली
By admin | Updated: April 22, 2016 02:31 IST