शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात दोन नवीन शासकीय कृषी महाविद्यालयांना तत्त्वता मान्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 13:35 IST

प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शासनाकडे पाठविला असून, शासनाने दोन महाविद्यालयांना तत्त्वता मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देविदर्भात सात शासकीय तसेच २८ खासगी कृषी महाविद्यालये आहेत.प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. चार कृषी महाविद्यालये मिळावीत, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला.

- राजरत्न सिरसाट

अकोला : कृषी अभ्यासक्रमाला व्यावसायिक दर्जा प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांचा कल या अभ्यासक्रमाकडे वाढला; परंतु शासकीय महाविद्यालयांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी येत आहेत. याच अनुषंगाने विदर्भात चार शासकीय पदवी कृषी महाविद्यालय देण्यात यावे, यासाठीचा प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शासनाकडे पाठविला असून, शासनाने दोन महाविद्यालयांना तत्त्वता मान्यता दिली आहे.विदर्भात सात शासकीय तसेच २८ खासगी कृषी महाविद्यालये आहेत. दुसरीकडे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. यावर्षी राज्यात एक लाखावर विद्यार्थ्यांनी कृषी पदवीसाठी अर्ज भरले होते. पण, खासगी वगळता शासकीय कृषी महाविद्यालये कमी असून, विदर्भात तर केवळ ही संख्या सात आहे. त्यामुळे विदर्भात केवळ २,३५० विद्यार्थी प्रवेश क्षमता असल्याने विद्यार्थ्यांना पर्याय निवडावे लागत आहेत. कृषी व्यावसायिक अभ्यासक्रम असल्याने यावर्षी राष्टÑीय प्रवेश पात्रता (नीट) पूर्व परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात आला. ५५ टक्केपर्यंत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थीच प्रवेशासाठी पात्र ठरल्याने, कृषी विद्यार्थ्यांकडे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी येत आहे. यातील बहुतांश विद्यार्थ्यांची कृषी या विषयाला पहिली पसंती असते. याच अनुषंगाने अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने चार कृषी महाविद्यालये मिळावीत, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. यातील यवतमाळ येथे अन्न व तंत्रज्ञान अभियांत्रिकी, तर मूल येथे कृषी महाविद्यालयासाठीची तत्त्वता मान्यता शासनाने दिली. यासंदर्भातील परिपत्रक लवकरच निघणार आहे. वािशम व बुलडाणा येथे प्रत्येकी एक शासकीय कृषी महाविद्यालयाची गरज असल्याने यासंदर्भातील पाठवलेला प्रस्तावही मान्य करण्यात आला. आता प्रत्यक्षात महाविद्यालय केव्हा सुरू होते, याकडे विदर्भातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. याच अनुषंगाने चार शासकीय महाविद्यालांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यातील दोन महाविद्यालयांना तत्त्वता मान्यता मिळाली असून, इतर दोन महाविद्यालयही देण्याचे शासनाने मान्य केले आहे.डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ