हिवरखेड : तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या झरी-चिचारी मार्गावर परस्पर विरुद्ध दिशेने जाणाºया दोन मोटारसायकल समोरासमोर धडकल्या. सकाळी ९ वाजताचे सुमारास झालेल्या या अपघातात दोघेही मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.चिचारी शेत शिवारातील इडा प्रदीप निगवाल हा एम.एच. ३०-८९७७ क्रमांकाच्या दुचाकीवरून झरीकडे जात होता. तर एमएच ३०-५०९१ क्रमांकाच्या दुचाकीवरुन इरफानखाँ शाहीद हा चिचारीकडे जात होता. रस्त्याने दोन्ही मोटारसाकलची समोरा-समोर धडक झाली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांना अकोला येथे सर्वोपचार रुगणालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार विकास देवरे, हवालदार दीपक गवई, अमर पवार करीत आहेत.
दोन मोटारसायकल समोरा-समोर धडकल्या; दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 14:36 IST
हिवरखेड : तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या झरी-चिचारी मार्गावर परस्पर विरुद्ध दिशेने जाणाºया दोन मोटारसायकल समोरासमोर धडकल्या. सकाळी ९ वाजताचे सुमारास झालेल्या या अपघातात दोघेही मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.चिचारी शेत शिवारातील इडा प्रदीप निगवाल हा एम.एच. ३०-८९७७ क्रमांकाच्या ...
दोन मोटारसायकल समोरा-समोर धडकल्या; दोन गंभीर
ठळक मुद्देहिवरखेड पोलिस ठाण्याअंतर्गत झरी-चिचारी मार्गावर घडला अपघातदोघेही मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले.दोघांनाही उपचारासाठी अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले.