शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात कोरोनाचे आणखी दोन बळी; मृतकांचा आकडा १६ वर; एकूण रुग्णसंख्या २१८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 18:59 IST

१५ मे रोजी दिवसभरात कोविडबाधित दोन महिलांचा मृत्यू, तर ११ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

ठळक मुद्देफिरदौस कॉलनी व मोमीनपूरा भागातील दोन महिलांचा मृत्यू.एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २१८ वर पोहचली.१०१ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अकोला : संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने अकोल्यातही विक्राळ रुप धारण केली असून, पॉझिटिव्ह रुग्णांसह मृतकांची संख्याही वाढतच आहे. शुक्रवार, १५ मे रोजी दिवसभरात कोविडबाधित दोन महिलांचा मृत्यू, तर ११ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. गुरुवार व शुक्रवारी अनुक्रमे फिरदौस कॉलनी व मोमीनपूरा भागातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १६ वर पोहचला आहे. तर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २१८ वर पोहचली असून, सद्यस्थितीत १०१ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनकडून सांगण्यात आले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून शुक्रवारी दिवसभरात १६१ अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर १५० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी सकाळी खडकी भागातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेले दहा रुग्णांपैकी चार जण आंबेडकर नगर न्यू बसस्टॅण्ड मागे, दोन फिरदौस कॉलनी, दोन भिम चौक- अकोट फैल तर गवळीपुरा व पंचशिल नगर वाशीम बायपास येथिल प्रत्येकी एक जणाचा त्यात समावेश आहे. यामधील पाच महिला व पाच पुरुष आहेत. दरम्यान, गुरुवार १४ मे रोजी फिरदौस कॉलनी भागातील ३७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, तीचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. तर शुक्रवारी दुपारी मोमीनपुरा भागातील एका ६५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर महिलेला ११ मे रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या दोन महिलांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोविड आजाराने मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १६ वर गेली आहे. एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्यामुळे जिल्ह्यातील एकूण १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे. दरम्यान, आतापर्यंत १०० जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन कक्षात १०१ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.आज प्राप्त अहवाल-१६१पॉझिटीव्ह-११निगेटीव्ह-१५०आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-२१८मयत-१७(१६+१),डिस्चार्ज-१००दाखल रुग्ण(अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१०१

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला