शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

कोरोनाचे आणखी दोन बळी; ३४० नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:18 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २३१० अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २३१० अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २०३९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील ४२, अकोट येथील २८, तेल्हारा येथील १३, कौलखेड येथील ११, मोठी उमरी येथील सहा, डाबकी रोड, खडकी, मलकापूर येथील प्रत्येकी पाच, जठारपेठ येथील चार, रणपिसेनगर, रजपूतपुरा, सिंधी कॅम्प, जीएमसी, केशवनगर व कान्हेरी गवळी येथील प्रत्येकी तीन, रतनलाल प्लॉट, शिवसेना वसाहत, लहान उमरी, खदान, रामदास पेठ, सेलार फैल, टेलिकॉम नगर, तुकाराम हॉस्पिटलजवळ, जवाहरनगर, हरिहर पेठ व विद्यानगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित निंभोरा, मित्रानगर, शिवनी, पोळा चौक, हिमायू रोड, सुधीर कॉलनी, सहकारनगर, कीर्ती नगर, न्यू तापडिया नगर, कलेक्टर ऑफिस, अनिकेत, हिंगणारोड, तोष्णीवाल ले-आऊट, खोलेश्वर, अंबिकानगर, प्रबोधननगर, सूर्या गार्डन, वर्धमाननगर, विठ्ठलनगर, सिव्हिल लाइन, मुझफर नगर, चौरे प्लॉट, खिरपुरी, भारती प्लॉट, निमकर्दा, उमरी, तारफैल, केळकर हॉस्पिटल, सिटी कोतवाली, श्रध्दा कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, दोनद खु., कोठीर वाटिका, जीएमसी होस्टेल, बाळापूर, सांगवी बाजार व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी मोठी उमरी येथील नऊ, बोरगाव मंजू व तेल्हारा येथील प्रत्येकी सात, अंबाशी, ता.पातूर व सुकोडा येथील प्रत्येकी चार, राधाकिसन प्लॉट, कुटासा, सुकोडा, गोरक्षण रोड, वाशिंबा व सांगळूद येथील प्रत्येकी दोन, तर शास्त्रीनगर, अंत्री, भारती नगर, हाता, तरोडा शेगाव, बाळापूर, सातव चौक, हनुमान वस्ती, रणपिसे नगर, उमरी, कवरनगर, आदर्श कॉलनी, पंचशील नगर, दानोरी, वरुर जऊळका, जांभा बु., हिरपूर, बापोरी, रवीनगर, पारसकर शोरूम, गांधीग्राम, पाचमोरी, मिर्झापूर, शिवर, वणी रंभापूर, मलकापूर, जीएमसी, देशमुख फैल, पोळा चौक, सिव्हिल लाइन, गड्डम प्लॉट व बाळापूर प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

३० वर्षीय युवकासह दोघांचा मृत्यू

कोरोनवर उपचार सुरू असलेल्या वानखडे नगर, अकोला येथील ६१ वर्षीय महिला रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला. त्यांना ४ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी सांगळुद येथील ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. त्यांना ३ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

९२ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २७, हेंडज कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथील १०, बिहाडे हॉस्पिटल येथील चार, ओझोन हॉस्पिटल येथील १०, आयकॉन हॉस्पिटल येथील नऊ, हॉटेल रिजेन्सी येथील चार, हॉटेल स्कायलार्क येथून सहा, युनिक हॉस्पिटल येथील एक, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील दोन, अवघाते हॉस्पिटल येथून सहा, आधार हॉस्पिटल मूर्तिजापूर येथून पाच, नवजीवन हॉस्पिटल येथून चार, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील चार,अशा एकूण ९२ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.

४,७७९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १९,१२० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १३,९५६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३८५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४,७७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.