शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

आणखी दोघांचा मृत्यू; ११७ नवे पॉझिटिव्ह; २९ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 19:06 IST

सोमवार २१ सप्टेंबर रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या बळीचा आकडा २११ वर पोहचला.

 अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, सोमवार २१ सप्टेंबर रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या बळीचा आकडा २११ वर पोहचला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ११७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६६५० झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३७८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११७ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २६१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील १३ जणांसह, जठारपेठ, डाबकीरोड, प्रसाद कॉलनी येथील प्रत्येकी पाच, निमवाडी येथील चार, जुने शहर येथील तीन, तुकाराम चौक, खोलेश्वर, आनंदनगर, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, कृषी नगर, शिवर-शिवणी, तारफैल, कमला नगर, वानखडे नगर, महाराजा अग्रसेन भवन जवळ, कमला प्लॉट, कान्हेरी गवळी, अकोट, चोहट्टा बाजार, पळसो बढे, दुर्गा चौक, खिरपुरी खुर्द, शरद नगर, अकोला, तिवसा, झोडगा, राधेनगर, पिंजर, रामनगर, रतनलाल प्लॉट, मलकापूर रोड, दहातोंडा, हातगाव, राजुरा घाटे, सांगवा मेळ येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये न्यु खेतान नगर व जठारपेठ येथील प्रत्येकी चार, डाबकी रोड येथील तीन, लक्ष्मी नगर मोठी उमरी, खडकी, आदर्श कॉलनी, मलकापूर रोड, चांदुर, रामनगर, कॉग्रेस नगर येथील प्रत्येकी दोन, सुधीर कॉलनी, राधे नगर, रेल ता. अकोट, गंगावल, आळशी प्लॉट, दहिगाव गावंडे, डॉक्टर कॉलनी मलकापूर, नांदगाव ता. बाळापूर, तेल्हारा, कौलखेड जहागीर, कैलास टेकडी, गजानन नगर, सिंधी कॅम्प, शिवणी, मोठी उमरी, झोडगा, पत्रकार कॉलनी, गोकुळ कॉलनी, तुकाराम चौक, गवळी पुरा, बलोदे ले-आऊट, जीएमसी व राजुरा सरोदे येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.शहरातील दोघांचा मृत्यूसोमवार आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये शिवाजी नगर, अकोला येथील ५४ वर्षीय पुरुष आणि विठ्ठल नगर येथील ६८ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.२९ जणांना डिस्चार्जसोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.१६७८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६२५० लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४७६१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २११ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १६७८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या