शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसपूर ग्रामपंचायतचे दोन सदस्य अपात्र

By admin | Updated: March 26, 2016 02:29 IST

अपर जिल्हाधिका-यांचा आदेश: शौचालय नसल्याने गेले सदस्यत्व.

अकोला: शौचालय नसल्याने म्हैसपूर ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश अपर जिल्हाधिकार्‍यांनी १६ मार्च रोजी दिला. त्यामुळे घरी शौचालय नसल्याने, ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांना सदस्यत्व गमवावे लागले.अकोला तालुक्यातील म्हैसपूर ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल ६ ऑगस्ट २0१५ रोजी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून अनुसूचित जाती या राखीव प्रवर्गातून दिलीप तुकाराम वानखडे सदस्य म्हणून निवडून आले. तसेच प्रभाग क्रमांक १ अनुसूचित जाती स्त्री राखीव प्रवर्गातून मीना संतोष इंगळे निवडून आल्या. निवडून आलेल्या दोन्ही ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वत:च्या जागेतील घरी शौचालय नाही. तसेच ग्रामपंचायत अंतर्गत गावामध्ये सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (१)(ज-५) अन्वये दोन्ही सदस्यांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी याचिका म्हैसपूर येथील सरपंच सविता सारंगधर इंगळे यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली होती. या प्रकरणात गत १0 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, दोन्ही ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालय नसल्याचे स्पष्ट झाल्याने आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ वे कलम १४ (ज-५) नुसार भंग केल्याने म्हैसपूर ग्रामपंचायतचे सदस्य दिलीप वानखडे व सदस्य मीना इंगळे यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र घोषित करण्यात येत आहे, असा आदेश अपर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांनी १३ मार्च रोजी पारित केला. त्यामुळे घरी शौचालय नसल्याने ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांचे सदस्यत्व गेले.