शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दारू दुकानांमध्ये ठेवावे लागेल एक किलोमीटरचे अंतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 14:34 IST

अकोला: देशी व विदेशी दारूचे नवीन दुकान सुरू करण्यासाठी आता एक हजार मीटरच्या (एक किलोमीटर) अंतराची अट घालण्यात आली आहे.

ठळक मुद्देदेशी दुकानाच्या दोन दुकानातील अंतरासाठी दोनशे मीटरची अट होती, तर विदेशी दारू दुकानाला अंतराचे नियम नव्हते. आता राज्य शासनाने नवीन दारू दुकानांना परवान्यासाठी एक किलोमीटरची अट घालण्यात आली आहे. ३ आॅक्टोबरपूर्वी ज्यांनी प्रस्ताव सादर केला आहे, त्यांना नवीन नियमातून सूट देण्यात आली आहे.

अकोला: देशी व विदेशी दारूचे नवीन दुकान सुरू करण्यासाठी आता एक हजार मीटरच्या (एक किलोमीटर) अंतराची अट घालण्यात आली आहे. यापूर्वी देशी दुकानाच्या दोन दुकानातील अंतरासाठी दोनशे मीटरची अट होती, तर विदेशी दारू दुकानाला अंतराचे नियम नव्हते; मात्र आता राज्य शासनाने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमात सुधारणा केली असून, त्यानुसार नवीन दारू दुकानांना परवान्यासाठी एक किलोमीटरची अट घालण्यात आली आहे.राज्यातील शहरांसह खेड्यामध्ये गलोगल्ली दारू दुकाने आहेत. त्यामुळे दारूच्या नशेत तर्र होणाऱ्यांकडून सामाजिक सलोखा बिघडल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. राज्यात वर्षाला सुमारे पाचशेपेक्षा अधिक नवीन दुकाने सुरू होतात. त्यामुळे दारू दुकानांची संख्या वाढतीच आहे. काही खेड्यांमध्ये दारू दुकान हटविण्यावरून वाद झाले आहेत. त्यामुळे अशावेळी दारूचे दुकान इतर ठिकाणी हटविण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदान प्रक्रिया राबवली जाते. यात अनेक वेळा दारू दुकानदाराचा विजय होत असल्याचे वास्तव आहे. राज्य शासनाने दारूबंदी अधिनियमात बदल करून दोन दारू दुकानांतील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशी मद्यालय (एफएल-२) सुरू करण्यासाठी दोन दुकानांतील अंतर दोनशे मीटरवरून एक हजार मीटर करण्यात आले आहे, तर विदेशी दारूच्या दुकानासाठीही हे अंतर एक किलोमीटर राहणार आहे. त्यामुळे महानगरांतील गल्लोगल्ली आणि गावागावांत सुरू होणाºया दारू दुकानांना लगाम लागणार असल्याचे दिसून येत आहे.स्पर्धा रोखण्यासाठी बदलराज्य शासनाने दारू दोन दुकानातील अंतर वाढविल्यामुळे झपाट्याने वाढणाºया दारू दुकानांच्या संख्येला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. आजूबाजूला असलेल्या दारू दुकानांमध्ये होणारी स्पर्धा रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी दिली आहे.आॅक्टोबरपूर्वीच्या प्रस्तावांना दिलासादेशी व विदेशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी ३ आॅक्टोबरपूर्वी ज्यांनी प्रस्ताव सादर केला आहे, त्यांना नवीन नियमातून सूट देण्यात आली आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र देशी मद्य अधिनियमात सुधारणा केली आहे. जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क आयुक्त किंवा राज्य शासनाकडे देशी व विदेशी मद्यालये सुरू अथवा स्थलांतर करण्यासाठी ३ आॅक्टोबरपूर्वी ज्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत, त्यांना या नवीन नियमातून वगळण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाliquor banदारूबंदी