शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 18:54 IST

अरुण शेषराव काठोळे रा.गांधीग्राम व नामदेवराव तुळशीराम धर्माळे रा.बांबर्डा असे मृतक शेतकºयांची नावे आहे.

गांधीग्राम/ रोहणखेड : सतची नापीकी व वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून गांधीग्राम व बांबर्डा येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अरुण शेषराव काठोळे रा.गांधीग्राम व नामदेवराव तुळशीराम धर्माळे रा.बांबर्डा असे मृतक शेतकºयांची नावे आहे.गांधीग्राम येथील अरुण शेषराव काठोळे (५०) हे रविवारी आपल्या शेतात गेले होते. तेथे त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे शेजारी असलेल्या शेतकºयांच्या लक्षात आले. शेतकºयांनी त्यांना तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री ११:३० दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. सोमवारी त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण काठोळे यांच्यावर पंधरा ते वीस हजार रुपये बँकेचे कर्ज आहे. तसेच पन्नास हजार रुपयांचे मुद्रा लोण आहे. तर नातलगांजवळून काही उसनवारी घेतलेली होती.गेल्या दोन वर्षांपासून त्यांना पीक झाले नाही. यंदाही भरपुर पाऊस झाल्यामुळे त्यांची कपाशी पिवळी पडली आहे. तसेच मूगाच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ते अस्वस्थ राहत होते. त्यातच त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांचे जवळ पाऊण एकर (३० गुंठे) शेत आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.रोहणखेड येथून जवळच असलेल्या बांबर्डा येथील नामदेवराव तुळशीराम धर्माळे (७५)यांनी २८ सप्टेंबर रोजी सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून शेततळ््यात उडी घेउन आत्महत्या केली. त्यांच्याकडे तीन एक शेती आहे. त्यांना गेल्या काही वर्षांपासून शेतात अल्प उत्पादन होत होते. शेती मशागतीसाठी त्यांनी सेवा सहकारी सोसायटीकडून ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.यावर्षी संततार पावसामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे, कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. २८ सप्टेंबर रोजी घरी कुणालाही न सांगता ते शेतात गेले होते. शेतातील शेततळ््यात उडी घेउन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी व आप्त परिवार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या