शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

दोन विभागांचे अधिकारी रडारवर!

By admin | Updated: March 24, 2016 02:21 IST

महाबीजमधील घोटाळा; पतसंस्थेच्या लिपिकास कोठडी

सचिन राऊत / अकोलामहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) कंपनीकडून शेतकर्‍यांनी खरेदी केलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी केल्यानंतर, त्यांना नुकसानभरपाईपोटी देण्यात आलेल्या ७0 लाख रुपयांच्या रकमेमध्ये हेराफेरी करणार्‍या महाबीजच्याच क्षेत्र अधिकार्‍यानंतर आता महाबीजच्या काहीअधिकार्‍यांसह आणखी दोन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाईचा फास आवळल्या जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील प्रभाकर तराळे नामक लिपिकास अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.महाबीजकडून गतवर्षी राज्यातील हजारो शेतकर्‍यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी केले होते. यामध्ये राज्यातील २८६ शेतकर्‍यांनी महाबीजकडून खरेदी केलेले सोयाबीन बियाणे केवळ ५ ते १0 टक्केच उगवल्याने शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे राज्यातील विविध भागाच्या शेतकर्‍यांनी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी महाबीजकडे केल्या होत्या. यावरून महाबीजच्या अधिकार्‍यांसोबतच पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांनीही या शेतीची पाहणी करून उगवणक्षमता योग्य असताना ८0 ते ९0 टक्के बियाणे न उगवल्याचा अहवाल दिला होता. या अहवालानंतर महाबीजने राज्यातील २८६ शेतकर्‍यांना ७0 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली. यामधील ६३ लाख रुपयांची नुकसानभरपाई वाटप करण्यात आली असून, यामध्ये मोठा घोळ झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी क्षेत्र अधिकारी दिलीप नानासाहेब देशमुख याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर महाबीज कर्मचारी पतसंस्थेचा लिपिक प्रभाकर तराळे याला अटक करण्यात आली असून, त्याच्यानंतर आता कृषी विभागाचे अधिकारी, पीकेव्ही व महाबीजच्या अधिकार्‍यांवर संशयाची सुई गेल्याने त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.अशी केली हेराफेरीबियाणे न उगवल्याची तक्रार महाबीजकडे केल्यानंतर महाबीजकडून ७0 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. ती रक्कम सहाय्यक क्षेत्र अधिकारी दिलीप देशमुख यांच्याकडे देऊन सदर नुकसानभरपाई शेतकर्‍यांना देण्याचे आदेश दिले; मात्र देशमुख याने ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना न देता ती परस्पर कर्मचारी पतसंस्थेच्या खात्यात जमा केली. ज्या पतसंस्थेचे ते सचिव आहेत, त्याच पतसंस्थेच्या खात्यात ही रक्कम जमा करून फसवणूक करण्यात आली आहे.