शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात दोन दिवस विदर्भ लेखिका साहित्य संमेलन; अध्यक्षपदी डॉ. शोभा रोकडे

By राजेश शेगोकार | Updated: April 21, 2023 15:53 IST

साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून विजयाताई ब्राह्मणकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, प्रा. किशोर बुटोले यांची प्रमुख उपस्थिती राहील.

अकोला : मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूरतर्फे आयोजित विदर्भ लेखिका साहित्य संमेलन अकोल्यात दि. २३ व २४ एप्रिल रोजी होत आहे. त्यानिमित्ताने विदर्भातील लेखिका, कवयित्रींची मांदियाळी दाेन दिवस अकोल्यात राहणार आहे.मलकापूर, अकोला येथील देविकामाई देशमुख प्राथमिक शाळेत आयोजित या संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखिका डॉ. शोभा रोकडे राहतील, तर संमेलनाचे उद्घाटन नागपूरच्या डॉ. मनीषा यमसनवार यांच्या हस्ते होईल. स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र पदवीधर संघर्ष संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय दुतोंडे राहतील. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून विजयाताई ब्राह्मणकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, प्रा. किशोर बुटोले यांची प्रमुख उपस्थिती राहील.

संमेलनाच्या निमित्ताने विशेषांकासह कवयित्री उषा भोपळे, डॉ. प्राची निचळ, विजया ब्राह्मणकर, देवका देशमुख, विजया कडू, ज्योती ताम्हणे, डॉ. वैशाली कोटंबे, विजया मारोतकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. ॲड. मंगला नागरे यांच्या अध्यक्षतेत गझल मुशायरा रंगणार आहे. २४ एप्रिल रोजी डॉ. अनघाताई सोनखासकर यांच्या अध्यक्षतेत कथाकथन होईल. शीलाताई गहिलोत यांच्या अध्यक्षतेत कवी संमेलन होईल. साहित्य संमेलनाच्या समाराेप सत्राला नीता बाेबडे, म. रा. साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी उद्याेजक सुगत वाघमारे, राजेंद्र देशमुख यांच्यासह मान्यवरांचा गाैरव करण्यात येणार आहे. संमेलनासाठी डॉ. विजय दुतोंडे, देवकामाई देशमुख, शीलाताई गहिलोत, अनघाताई साेनखासकर, वैशाली काेटंबे, प्रतिभा पाथ्रीकर आदी परिश्रम घेत आहेत. 

वैदर्भीय प्रतिभेला मिळणार वावसंमेलनात वैदर्भीय प्रतिभेला वाव मिळणार असून, विदर्भातील विविध क्षेत्रातील महिलांना ‘विदर्भ स्त्री रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. डाॅ. उषाकिरण आत्राम यांच्या अध्यक्षतेत ‘वैदर्भीय लेखिकांचे लेखन’ या विषयावर परिसंवाद हाेईल. माधुरी अशिरगडे यांच्या अध्यक्षतेत प्रिया बापट यांच्या उपस्थितीत विदर्भातील ११ जिल्ह्यांतील २५ कवयित्री कविता सादर करतील. कप्पा मनातला अंतर्गत ‘माझं आईपण’ या विषयावर परिसंवाद हाेईल. 

टॅग्स :Akolaअकोला