बुलडाणा : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर आज या अर्जांची छानणी करण्यात आली. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघातील निवडणूक मैदानात असलेले १८६ इच्छुक उमेदवारांपैकी २६ उमेदवारांचे नामांकन अर्ज विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात आता १६0 उमेदवार आहेत. रद्द झालेल्या अर्जांमध्ये बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून १, चिखली ४, खामगाव ३, जळगाव जामोद ५, मलकापूर २ व मेहकरमध्ये ११ अर्ज रद्द करण्यात आले. रिंगणात उरलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी १ ऑक्टोबर ही मुदत आहे. या दोन दिवसात तडजोडी आणि वाटाघाटीच्या राजकारणाला जोर येणार असून, मतविभाजन टाळण्यासाठी अपक्ष तसेच बंडखोरांच्या मनधरणीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. जळगाव जामोद मतदार संघात एकूण २८ पैकी आज चार जणांचे अर्ज पक्षाचे एबी फॉर्म जोडले नसल्याने तर एकाचा फॉर्म अर्जावर सही नसल्याने तसेच शपथ पत्रावर वडिलांऐवजी आजोबाचे नाव असल्याने अपात्र ठरविण्यात आला. आता या मतदारसंघात २३ जण कायम आहेत. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात रेखा ताई खेडेकर राष्ट्रवादीकडून, डॉ. शशिकांत खेडेकर शिवसेनेकडून, विनोद वाघ मनसेकडून, डॉ. गणेश मांटे भाजपकडून, प्रदीप नागरे काँग्रेसकडून, वसंतराव मगर बस पाकडून यांनी अर्ज दाखल केले आहेत. मेहकर विधानसभा मतदार संघात ११ उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. आता ३३ उमेदवार रिंगणात आहेत. छानणीमध्ये ११ उमेदवार अवैध ठरविण्यात आले आहेत. खामगाव मतदारसंघामध्ये १९ पैकी तिघांचे नामांकन अर्ज त्रुटीमध्ये बाद झाले आहेत. मलकापूर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २२ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. दरम्यान, आज झालेल्या छानणीमध्ये यातील रंजना संतोष बोरकर रा.शेंबा व विश्वास रामदास नारखेडे रा.शेंबा या दोघांचे अर्ज त्रुटी असल्याने बाद झाले. त्यामुळे आता या मतदार संघात छानणीनंतर २0 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी दाखल २६ अर्जांपैकी २५ अर्जं वैध ठरले तर एक नामाकंन अर्ज एबी फॉर्म व दहा सूचकांच्या सह्या नसल्यामुळे रद्द करण्यात आला आहे. चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये एकुण २७ अर्जांंपैकी ४ अर्ज रद्द ठरविण्यात आले आहेत.
नाराजांच्या मनधरणीसाठी दोन दिवस
By admin | Updated: September 30, 2014 00:13 IST