शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवस शाळा बंद ठेवणारे शिक्षक मोकाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुख्याध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल झाल्यानंतर वरिष्ठांना कोणतीही माहिती न देता दोन दिवस शाळा बंद ठेवणार्‍या शिक्षकांवर जिल्हा परिषदेने अद्यापही कोणतीच कारवाई केली नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्यामुळे उघड झाले. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी तसा अहवाल सांगत, कारवाई झाली नसल्याचे सभेत सांगितले.तेल्हारा ...

ठळक मुद्देभिली येथील आरोपी शिक्षकांवर अद्यापही कारवाई नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुख्याध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल झाल्यानंतर वरिष्ठांना कोणतीही माहिती न देता दोन दिवस शाळा बंद ठेवणार्‍या शिक्षकांवर जिल्हा परिषदेने अद्यापही कोणतीच कारवाई केली नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्यामुळे उघड झाले. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी तसा अहवाल सांगत, कारवाई झाली नसल्याचे सभेत सांगितले.तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत भिली जिल्हा परिषद शाळेत कार्यरत मुख्याध्यापक एकनाथ रामचंद्र घुरडे यांनी १७ जुलै रोजी मूर्तिजापूर येथे आत्महत्या केली. शाळेतील सहायक शिक्षक सुभाष ढोकणे, प्रकाश ढोकणे, संजय गासे, गजानन काळबांडे, अमोल राखोंडे, रवींद्र सोळंके यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले. त्यावरून सहा शिक्षकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल झाले. त्यादरम्यान, आरोपी शिक्षकांनी शाळेत उपस्थित न राहता ती बंद ठेवली. तसेच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून त्याच शाळेत रुजू होण्याची तयारी सुरू केली. आत्महत्येस कारणीभूत असल्याचे पुरावे शाळेतच आहेत, त्यामुळे त्या शिक्षकांना तेथे रुजू करू नये, त्यांची इतरत्र बदली करावी, या मागणीचे निवेदन मृतकाचा मुलगा अनुप घुरडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना २७ जुलै रोजीच दिले आहे. त्यावेळी शिक्षकांनी दोन दिवस शाळा अनधिकृतपणे बंद ठेवल्याचा प्रकारही पुढे आला. त्याचा अहवाल तेल्हारा गटशिक्षणाधिकार्‍यांनी शिक्षणाधिकार्‍यांना पाठवला. त्यावर कारवाईच झाली नसल्याचे सभेत पुढे आले. त्यावर एवढय़ा गंभीर बाबीवरही जिल्हा परिषदेचे किती दुर्लक्ष आहे, हे दिसून आले. 

सदस्यांमध्ये सभागृहातच जुंपलीशिक्षकांवर कारवाई का केली नाही, त्यापैकी काही शिक्षकांवर आधीचेही गंभीर गुन्हे असल्याचे पांडे गुरुजी सांगत असताना बेलखेडचे जिल्हा परिषद सदस्य गजानन उंबरकार त्यांच्यावर चांगलेच उसळले. आधीचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती तुमच्याकडे आहे का, काहीही सभागृहात सांगू नका, असे त्यांनी सुनावले. या प्रकाराने पांडे गुरुजी क्षणभर अवाक झाले. गुन्हे दाखल असल्याचे जाऊ द्या, शाळा दोन दिवस बंद नव्हती का, यावर मात्र, उंबरकार सहमत झाले. 

ढोकणे यांच्यावर आधीचेही गुन्हेमुख्याध्यापक घुरडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील आरोपी सुभाष ढोकणे यांच्यावर हिवरखेड पोलिसात तीन गुन्हे दाखल आहेत, तर संजय गासे यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे, ढोकणे यांच्यावर एप्रिल २0१७, मार्च २0१६ या लगतच्या काळात गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरीही त्यांना शिक्षण विभागाकडून सूट देण्याचा प्रकार घडत आहे. -