पातूर (अकोला): पातूर शहरात सिदाजी वेटाळात दोन समाजाच्या तरुणांमध्ये जुन्या वैमनस्यातून रविवार, १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हाणामारी होऊन एक तरूण गंभीर जखमी झाला.या प्रकरणी पातूर पोलिसांनी ४ जणांविरुध्द कलम ३0७ भादंवि नुसार गुन्हा दाखल केला असून ,दोन आरोपींना अटक केली.या प्रकरणी यासीर अराफत म.यासीन यांनी पातूर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिार्यादीनुसार यासीर अराफत व सै.अशर सै.अकील हे दोघे दुचाकीवरून सिदाजी वेटाळातून येत असताना सागर विजय रामेकर व इतर तिघा जणांनी सै.अशर यास मारहाण केली.सै.अशर यास डोक्यावर लाकडी काठीने मारल्याने त्याच्या डोक्याला जखम झाली.त्यास तातडीने अकोला येथे हलविण्यात येऊन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दाखल फिर्यादीवरुन पातूर पोलिसांनी सागर विजय रामेकर व सागर उर्फ नीतेश गजानन इंगळे या दोघांना अटक केली . अन्य दोघे पसार झाले आहेत.
पातूरमध्ये दोन समाजात हाणामारी
By admin | Updated: October 20, 2014 01:42 IST