शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट श्वानांच्या हल्ल्यात दोन लहान मुले गंभीर जखमी, मनपा अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा

By आशीष गावंडे | Updated: January 4, 2023 17:57 IST

शहरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मनपा प्रशासनाकडून मोकाट श्वानांच्या बंदोबस्त होत नसल्यामुळे नागरिकांच्या व लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

अकोला - मोकाट श्वानांच्या हल्ल्यात दोन लहान मुले गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी शहराच्या मलकापूर परिसरात घडली. स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेऊन कुत्र्यांच्या तावडीतून दोन्ही मुलांना सोडवले. जखमी मुलांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, मोकाट कुत्र्यांच्या समस्येला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप करीत पुढील सात दिवसात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास मनपा अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई यांनी दिला.

शहरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मनपा प्रशासनाकडून मोकाट श्वानांच्या बंदोबस्त होत नसल्यामुळे नागरिकांच्या व लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. लहान मुलांना घराबाहेर व शाळेमध्ये जाणे मुश्किल झाले आहे. प्रभाग क्रमांक १४ मधील मलकापूर येथील परी परसोबे ही सहा वर्षाची चिमुकली शाळेमध्ये जात असताना तिच्यावर अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला चढविला. तसेच अंगणामध्ये खेळत असलेल्या तीन वर्षाच्या  कबीर गोपनारायण या चिमुकल्या मुलावर पिसाळलेला कुत्र्याने हल्ला केला. या दोन्ही घटनेत लहान मुलांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

रहिवाशांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण -पिसाळलेल्या कुत्र्याने या दोन्ही लहान मुलांवर हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्थानिक रहिवाशांनी जीवाची पर्वा न करता या दोन्ही मुलांना कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. तसेच क्षणाचाही विलंब न लावता त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. 

भटक्या कुत्र्यांचा आठ दिवसात बंदोबस्त करा अन्यथा... -शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मनपा प्रशासनाचा निर्बिजीकरणाचा प्रयोग सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता पराग गवई यांनी केला आहे. निर्बिजीकरणावर सुमारे सव्वा कोटी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेने पुढील आठ दिवसात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा पराग गवई यांनी दिला आहे.

टॅग्स :dogकुत्राAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला