शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोहारा येथे दोन घरफोड्या; लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 18:10 IST

 लोहारा : अज्ञात चोरट्यांनी लोहारा येथे रविवारी हैदोस घालत दोन घरांमध्ये धाडसी चोरी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क लोहारा : अज्ञात चोरट्यांनी लोहारा येथे रविवारी हैदोस घालत दोन घरांमध्ये धाडसी चोरी केली. चोरट्यांनी दोन्ही घरांमधील सोन्याच्या दागिण्यासह  २.८६ लाखांचा एवज लंपास केला. या प्रकरणी उरळ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद् गुन्हा दाखल केल आहे.  लोहारा येथील माजी उपसरपंच हिंमतराव तायडे हे रविवारी रात्री उकाड्यामुळे घराच्या गच्चीवर झोपले होते. त्यांच्या घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. तसेच  लोखंडी कपाटातील सोन्या चांदीच्या दागीन्यांसह इतर एवज साहित्य असा दोन लाख ८६ हजारांचा एवज लंपास केला.तायडे हे सकाळी घरामध्ये आले असता त्यांना कपाट तुटलेले आढळले. तायडे यांच्या घरात चोरी केल्यानंतर चोरट्यांनी अन्सार देशमुख यांच्या घरात प्रवेश  करून कपाटातील सोन्याचे दागीने व २० हजार रुपये रोख लंपास केले.चोरट्यांनी चोरी केल्यानंतर त्यांच्या घराला बाहेरून कडी लावली. घटनेची माहिती मिळताच पो.स्टे.उरळ चे ठाणेदार सतीश पाटिल, पोउपनि.के.झेड मावस्कर, बीट जमादार संजय वानखडे यांनी व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.तसेच अकोल्यावरून आयकेअरकार व श्वान पथक दाखल झाले. याप्रकरणी फियार्दी हिंमतराव तायडे तसेच अन्सार देशमुख यांच्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवी कलम ४५७,३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.एकाच रात्री दोन घरांमध्ये घरफोडी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी