शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी; महिला आरोपीचे न्यायालयीन कोठडीत रवानगी

By सचिन राऊत | Updated: April 21, 2024 17:25 IST

खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी अल्पवयीन मुलगी घरी असताना आरोपीने फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीचे मोबाइलमध्ये फोटो काढले व तिचा विनयभंग केला.

अकोला : खदान पोलिस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन मुलीचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत या मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या दोद्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे तर महिला आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे. आरोपीमध्ये सादीक शाह लतिफ शाह, अफरोज खान व एका महिलेचा समावेश आहे.

खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी अल्पवयीन मुलगी घरी असताना आरोपीने फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीचे मोबाइलमध्ये फोटो काढले व तिचा विनयभंग केला. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बदनामी करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने खोलीमध्ये बंद करून निघून गेले. त्यानंतर पीडितेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. याबाबत काहीही सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीमुळे आई-वडिलांनी पीडितेला मोठ्या बहिणीसोबत बाहेरगावी पाठवून दिले.

तत्पूर्वी आरोपी शाह व खान याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली होती. या प्रकरणी खदान पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सादिक शाह लतिफ शाह, अफरोज खान व आणखी एका महिलेविरूध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सायरे करीत असतानाच दोन्ही आरोपींना अटक केली. त्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.तर महिला आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.