मंगरूळपीर () : फिर्यादीचे वाहन अडवून चाकूचा धाक दाखवून जबरीने पैसे व मोबाईल हिसकल्याप्रकरणी आरोपीस येथील न्यायालयाने अडीच वर्ष सङ्म्रम कारावासाची शिक्षा ४ फेब्रुवारी रोजी सुनावली आहे. अधिक माहितीनुसार फिर्यादी सर्वेश साहेबराव पवार यांनी पोलिसात तक्रार दिली होती की, दि २१ जुलै २0१४ रोजी फिर्यादी मोटारसायकलने गोलवाडीवरून रुई गोस्ता येथे जात असताना आरोपी सतीश कांबळे याने अंबापूर फाट्यावर फिर्यादीची मोटारसायकल अडवून तसेच चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या खिशातील नगदी २ हजार ८00 रुपये, मॅक्स कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावून नेला, अशा फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अपराध क्र.१७४/१४ कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. यानंतर तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत पारडकर यांनी सदर प्रकरण न्यायालयात दाखल केल्यानंतर येथील प्रथमङ्म्रेणी न्यायदंडाधिकारी एस.एन. रोकडे यांनी या प्रकरणातील आरोपीस अडीच वर्ष सङ्म्रम कारावास व १ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अँड.एम.जी. शर्मा यांनी काम पाहिले.
वाटमारीच्या आरोपीस अडीच वर्ष सश्रम कारावास
By admin | Updated: February 6, 2015 02:04 IST