शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीत अडीच पटीने वाढ

By admin | Updated: August 9, 2014 00:12 IST

अमरावती विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ६ ऑगस्टपर्यंतची कारवाई.

संतोष वानखडे / वाशिम भ्रष्टाचाराविरूद्ध अख्खा देश पेटलेला असतानाही, भ्रष्टाचार व लाचखोरी कमी होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाहीत. एकट्या अमरावती विभागात गतवर्षीच्या तुलनेत लाचखोरीच्या प्रकरणात अडीचपट वाढ झाल्याची साक्ष अमरावती विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आकडेवारी देत आहे. गतवर्षी जानेवारी ते ६ ऑगस्ट २0१३ पर्यंत ३३ सापळे यशस्वी झाले होते. यावर्षी जानेवारी ते ६ ऑगस्ट २0१४ पर्यंत ७७ सापळे यशस्वी झाले आहेत.लाच देणे आणि घेणे दोन्हीही बाबी कायद्यात बसणार्‍या नाहीत. तरी देखील लाचेचा व्यवहार अव्याहतपणे सुरू असल्याचे कारवाईवरून दिसून येते. लाचेच्या मागणीला कंटाळून किंवा लाचखोरांना धडा शिकविण्यासाठी अर्जदार हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवितो. प्राप्त तक्रारीवरून कारवाई केली जाते. जानेवारी ते ६ ऑगस्ट २0१३ या दरम्यान अमरावती विभागात ३३ सापळे यशस्वी झाले होते. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १0 सापळे अकोला जिल्हयात तर सर्वात कमी ४ सापळे यवतमाळ जिल्हयात यशस्वी झाले आहेत. २0१४ मध्ये हा आकडा जवळपास अडीच पटीने वाढला आहे. जानेवारी ते ६ ऑगस्ट २0१४ पर्यंत अमरावती विभागात एकूण ७७ सापळे यशस्वी झाले. ७७ सापळयातून ७१ जणांवर कारवाई करण्यात आली. गतवर्षी सर्वात कमी असलेल्या यवतमाळ जिल्हयात यावर्षी सर्वाधिक २0 सापळे यशस्वी झाले आहेत. वाशिममध्ये १0, अकोला १४, अमरावती १९, बुलढाणा १४ अशी यशस्वी सापळयांची आकडेवारी आहे. २0११ मध्ये भ्रष्टाचार व लाचखोरीच्या विरोधात अख्खा देश टिम अण्णाच्या नेतृत्वात पेटून उठला होता. लाचखोरी कमी होई असे वाटत असतांनाच , चित्र मात्र उलटे झाले. पूर्वीच्या तुलनेत लाचखोरांची संख्या वाढत आहे. लाचखोरीचा आलेख वाढला असल्याने अमरावती विभागातील उदाहरण प्रातिनिधक स्वरूपातील आहे. राज्यात सर्वत्रच लाचखोरीच्या सापळयात वाढ झाली आहे.