शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील बारा शाळांना १५ लाखांचे शैक्षणिक साहित्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:33 IST

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांशी संलग्नित चार शाळांसह इतर आठ शाळांना शुक्रवारी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यात आले.

अकोला: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे आणि शाळा, शिक्षकांनासुद्धा चांगले शिक्षण देता यावे, या उद्देशाने महाबीजच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून तब्बल १५ लाख रुपयांची शाळांना मदत करण्यात आली. या निधीतून जिल्ह्यातील चार आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांशी संलग्नित चार शाळांसह इतर आठ शाळांना शुक्रवारी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यात आले.शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणीकृत तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण प्राप्त व्हावे, या उदात्त हेतूने प्रेरित होऊन महाबीज अकोला यांनी औद्योगिक सामाजिक बांधीलकी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील दर्जेदार गुणवत्ता असणाºया १२ शाळांची निवड करण्यात आली. या निवड करण्यात आलेल्या शाळांमध्ये शिकणाºया गोरगरीब व शेतकऱ्यांच्या मुलांना डिजिटली स्मार्ट बनविण्यासाठी शाळेला १५ लाख रुपये किमतीचे इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले, संगणक संच, एलईडी, यूपीएस, प्रोजेक्टर, अ‍ॅन्ड्रॉइड टॅब उपलब्ध करून देण्यात आले. शुक्रवारी महाबीजच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाबीज व्यवस्थापक अनिल भंडारी होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, डाएटचे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे, महाबीजच्या संचालक अनिता चोरे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते निवडक शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमामध्ये महाबीजचे व्यवस्थापक अनिल भंडारी यांनी सीएसआर फंड निर्माण केला असून, या फंडातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणार आहे. जिथे शैक्षणिक साहित्याची मदत हवी असेल, तिथे आम्ही देण्याचा प्रयत्न करू, असे मत व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनीसुद्धा शैक्षणिक साहित्यातून विद्यार्थी, शाळेची प्रगती साधा आणि गुणवत्ता दाखवा तर पालक जि.प. शाळांकडे वळतील, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन डाएटचे भाषा सहायक जितेंद्र काठोळे यांनी केले. कार्यक्रमाला महाबीजचे सचिव विनय वर्मा यांच्यासह जिल्हा परिषद व आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्नित शाळेचे मुख्याध्यापक व तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते. या शाळांना मिळाले शैक्षणिक साहित्यमहाबीजच्या ‘सीएसआर’ फंडामधून बार्शीटाकळी तालुक्यातील जि.प. शाळा सिंदखेड, बाळापूर तालुक्यातील जि.प. शाळा वाडेगाव, पातूर तालुक्यातील जि.प. शाळा दिग्रस, अकोट तालुक्यातील जि.प. शाळा बोर्डी आणि जि.प. उर्दू शाळा मलकापूर, शासकीय अभ्यास शाळा, डाबकी, जि.प. शाळा किनखेड, जि.प. शाळा हाता, जि.प. शाळा सारकिन्ही, जि.प. शाळा मधापुरी, जि.प. शाळा अंधारसांगवी, जि.प. शाळा आडसूळ या शाळांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा