शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तुषार पुंडकर हत्याकांड :  मारेकरी टप्प्यात; तीन पथकांकडून शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 13:38 IST

लवकरच ते पोलिसांच्या तावडीत सापडतील. असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

अकोट: प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्येचा तपास अत्यंत बारकाईने करण्यात येत असून, हत्याकांडातील मारेकरी पोलिसांच्या टप्प्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे हत्याकांडाची उकल रविवारपर्यंत होण्याची शक्यता आहे. पोलिसांचे एक पथक भुसावळला जाण्याची शक्यता असून मारेकऱ्यासंबधी पोलीस पुरावे गोळा करीत आहेत.तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहर पोलीस स्टेशन वसाहतीत गोळीबार करून २१ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. हत्याकांडाचा पोलीस बारकाईने तपास करीत असून, त्यासाठी तीन पोलीस पथक कार्यरत आहेत. यामध्ये तुषार पुंडकर यांच्या हत्येमागील कारण, गोळीबार करणारे व सुपारी देणारा आरोपी, या तिन्ही बाजंूनी तपासाची चक्रे फिरविली जात आहेत. डम्पडाटा तपासणीसह अनेकांची उलट तपासणी करून जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. या तपासात काही दिवसांपूर्वी कबुतरी मैदानावर देशीकट्टासंबंधी घटना घडली होती. या घटनेसंदर्भात पोलिसांनी दोन-तीन जणांची कसून विचारपूस केली. देशीकट्टा व तुषार पुंडकर यांचे छायाचित्र कोणाकडून आले. देशीकट्टा कुठून आला. या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. हत्याकांडाशी संबधित तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक एका जणाला घेऊन भुसावळला जाण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या एकंदरीत तपासातून हत्याकांडातील आरोपी रडावर आले असून, लवकरच ते पोलिसांच्या तावडीत सापडतील. असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :akotअकोटAkolaअकोला