शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

तुषार पुंडकर हत्याकांड : दहा दिवस उलटूनही ‘तो’ मोबाइल ‘स्वीच ऑफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 11:30 AM

हल्लेखोरांना पाहणारा एकही मुख्य साक्षीदार पोलीस तपासात निष्पन्न होऊ शकला नाही.

- विजय शिंदे लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: दहा दिवस उलटूनही पालकमंत्री बच्चू कडू यांचे कट्टर समर्थक तुषार पुंडकर यांच्या हत्याकांडात कुठलाही धागा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. घटनेपासून तुषार यांचा मोबाइल सुरू करण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे तुषारचा मोबाइल सुरू झाल्यास अनेक रहस्य व तपासाला दिशा देणारी माहिती बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हल्लेखोरांना पाहणारा एकही मुख्य साक्षीदार पोलीस तपासात निष्पन्न होऊ शकला नाही. हल्लेखोर व मुख्य सूत्रधार मोकाट असून, डम्पडाटा व हेरगिरीवरच तपासाचे दिवस निघत आहेत.अकोट शहर पोलीस वसाहतीत २१ फेब्रुवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर याच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आली. घटनास्थळावर गावठी पिस्तूल, काडतूस व जखमी अवस्थेत पडलेला तुषार याव्यतिरिक्त घटनास्थळावर हल्लोखोरांनी कोणताही ठोस पुरावा सोडला नाही. हल्लेखोरांनी थेट पोलीस वसाहतीची भीती न ठेवता गोळ्या झाडल्या. घटनास्थळावर असलेली तुषारची चप्पल आढळली.तुषार मोबाइलवर बोलत दूध डेअरीवरून बाहेर निघाला. त्यानंतर गोळीबार होताच तुषारचा बंद मोबाइल अद्यापही सुरू झाला नाही. पोलिसांनी मोबाइल फिंगर प्रिंटवर उघडणार म्हणून अकोला येथे तुषारची बोटे लावून उघडण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नसल्याचे समजते. त्यामुळे मोबाइल एक्सपर्ट व फॉरेन्सिस लॅबमधून अद्यापही हा मोबाइल उघडलाच गेला नाही काय, असा प्रश्न अनेकांच्या डोक्यात शिरला आहे. तुषार यांच्या मोबाइलमध्ये हत्याकांडाला कारणीभूत काही धागेदोरे व अनेक गंभीर रहस्य दडलंय काय, याची उत्सुकता नागरिकांना आहे. मोठमोठे नेते यांच्या संपर्कात राहणारा तुषार पुंडकर संबंधीची माहिती स्थानिक पातळीवर डम्पडाटा व शहरात हेरगिरी करण्यातच पोलीस पथके गुंतल्याने विशेष प्रगती नसल्याची माहिती पुढे येत आहे.

काही जण ‘रडार’वरतुषार यांना जीवाने मारेपर्यंत तीन गोळ्या झाडण्यामागे निश्चितच मोठे कारण असल्याची चर्चा सर्वत्र आहे. पोलिसांना ठोस माहिती देण्यास कोणीही पुढे येत नसल्याने अज्ञात हल्लेखोरांची दहशतीची गडद छाया शहरात दिसत असून, काहीजण पोलिसांच्या रडारवर असून, त्यांची घरझडती घेतली. त्यांच्या घराजवळचे सीसी कॅमेरे तपासले असून, त्यांना चौकशीसाठी वारंवार बोलाविण्यात येत असून, शहर न सोडण्याची ताकीद दिल्याचे समजते.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीakotअकोट