शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

तुषार पुंडकर हत्याकांड : ‘रेकी’ करीत मारेक ऱ्यांनी डाव साधला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 11:09 IST

पोलीस यंत्रणासुद्धा तपासात चक्रावून गेली असल्याने ठोस माहिती अद्यापही पुढे आली नसल्याचे दिसत आहे.

- विजय शिंदे लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांची मारेकऱ्यांनी रेकी करीत हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. यामुळे तुषारच्या हत्याकांडाची एखादी कडी अकोटात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सर्व घटनाक्रम पाहता पोलीस यंत्रणासुद्धा तपासात चक्रावून गेली असल्याने ठोस माहिती अद्यापही पुढे आली नसल्याचे दिसत आहे.अकोट शहरातील पुंडकर दूध डेअरी व पोलीस वसाहत या दरम्यान २१ फेब्रुवारी रोजी रात्री दुचाकीवर आलेल्या शुटरने देशी कट्ट्याने गोळ्या झाडून हत्या केली. विशेष म्हणजे मारेकरी शॉर्प शुटर असल्याचे बोलल्या जात आहे. तरी मात्र तुषार नेमका कुठे बसलेला आहे आणि त्याच्यावर हल्ला केल्यानंतर तो कुठे पळून जाऊ शकतो, याची रेकी मारेकºयांनी केली असल्याचे निवडलेल्या घटनास्थळावरून दिसून येत आहे. मारेकºयांनी पुंडकरची दूध डेअरी असतानाही पोलीस स्टेशननजीक जोखिमीचे ठिकाण का निवडले, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या ठिकाणी असलेल्या अंधाराचा फायदा घेत अचूकपणे तुषार यांच्यावर हल्ला चढवल्याने तुषार पोलीस वसाहतीत पळाल्यास त्या ठिकाणी हल्ला करून पसार कसे होता येईल, याची माहिती बहुधा मारेकºयांना असावी किंवा दिली असावी. त्यामुळे पोलीस वसाहतीत त्याच्यावर दोन गोळ्या झाडून समोरील रस्त्याने दुचाकीवरून सहजरीत्या पळून गेले.सुपारी देऊन हत्या केल्याचा संशयदुचाकीवरून आलेल्या दोघांनी ज्या पद्धतीने तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार केला त्यावरून ते सराईत गुन्हेगार असल्याचे दिसते. त्यामुळे पुंडकर यांची हत्या सुपारी देऊन केल्याची शक्यता नाकारता येत नाही. मारेकºयांनी घटनास्थळावर कुठलाही पुरावा ठेवला नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे. पोलीस अधिकाºयांनी तुषार पुंडकर यांच्याशी खटके उडालेल्या व गंभीर घटनेत तुषार विरुद्ध फिर्याद व जुन्या घटनेशी संबंधित असणाºयांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून सखोल चौकशी सुरू केली आहे. या चौकशीतून एखादी कडी हाती लागते का, याचा तपास केला जात आहे. तुषारचे मित्र व पक्षसंघटनेतील संबंधित यांच्याकडूनही बारीकसारीक माहिती घेतली जात आहे.

 

टॅग्स :akotअकोटCrime Newsगुन्हेगारी