शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘स्टिकर’ लावून ३५ रुपये किलो दराने विकली जाणार तूर डाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 15:21 IST

अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना प्रतिकिलो ५५ रुपये दराने विकली जाणारी तूर डाळ ३५ रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणार आहे.

ठळक मुद्देरास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना यापूर्वी प्रतिकिलो ५५ रुपये दराने तूर डाळीचे वितरण करण्यात येत होते. ५५ रुपये प्रतिकिलो दराने वाटप करण्यात येत असलेली तूर डाळ प्रतिकिलो ३५ रुपये दराने वितरित करण्याचा निर्णय शासनामार्फत ५ जून रोजी घेण्यात आला.३५ रुपये प्रतिकिलो दर असे ‘स्टिकर ’लावून रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना तूर डाळ विकण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

- संतोष येलकर

अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना प्रतिकिलो ५५ रुपये दराने विकली जाणारी तूर डाळ ३५ रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणार आहे. ५५ रुपये किंमत असलेल्या पाकिटावर आता ३५ रुपये प्रतिकिलो असे ‘स्टिकर’ लावून तूर डाळ विकली जाणार आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यात रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना यापूर्वी प्रतिकिलो ५५ रुपये दराने तूर डाळीचे वितरण करण्यात येत होते; मात्र रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये प्रतिकिलो दराने वाटप करण्यात येत असलेली तूर डाळ प्रतिकिलो ३५ रुपये दराने वितरित करण्याचा निर्णय शासनामार्फत ५ जून रोजी घेण्यात आला. त्यानुषंगाने गत २० जून रोजी मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यातील रास्तभाव दुकानांमध्ये आणि शासकीय धान्य गोदामांमध्ये शिल्लक असलेल्या तूर डाळीच्या पाकिटांवर ५५ रुपये प्रतिकिलो दर नमूद असल्याने, या तूर डाळीच्या पाकिटांवर ३५ रुपये प्रतिकिलो दर असे ‘स्टिकर ’लावून रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना तूर डाळ विकण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. त्यानुसार स्टिकर लावून ३५ रुपये प्रतिकिलो तूर डाळ रास्तभाव दुकानांमधून विकण्याचा आदेश शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत २० जून रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाºयांना देण्यात आला. त्यानुसार आता रास्तभाव दुकानांमध्ये शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये प्रतिकिलो दराच्या पाकिटावर ३५ रुपये प्रतिकिलो दराचे स्टिकर लावून तूर डाळीचे वितरण करण्यात येणार आहे.शासन निर्णयानुसार जिल्ह्यात रास्तभाव दुकानांमध्ये ५५ रुपये प्रतिकिलो दराच्या तुरीच्या पाकिटावर ३५ रुपये प्रतिकिलो दराचे ‘स्टिकर’ लावून शिधापत्रिकाधारकांना तूर डाळीचे वितरण करण्यात येणार आहे.- संतोष शिंदेजिल्हा पुरवठा अधिकारी

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना