शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करा! - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 18:21 IST

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.

अकोला: जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, तसेच सेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्ष, सचिव यांनी आपापल्या सभासद व त्यांच्या कुटूंबियांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करुन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.विधानसभा निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था, तसेच सेवा सहकारी संस्थांच्या अध्यक्ष सचिव आदींची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी पापळकर यांच्या समवेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांनी आपापल्या संस्थेतील रहिवासी मतदारांना मतदानासाठी आवाहन करावे. तसेच त्यांनी मतदान केले की नाही याची त्यांना आठवण करुन द्यावी. या प्रयत्नातूनही मतदान करणारांचे प्रमाण वाढेल. शहरातील उच्चभ्रू वसाहतींत या प्रयत्नातून नक्कीच लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित करता येईल. तसेच ग्रामिण भागात सेवा संस्थांच्या माध्यमातून मतदारांना प्रोत्साहित करता येईल. या प्रयत्नातून आपण साº्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी केले.जिल्हा उपनिबंधक लोखंडे यांनीही यावेळी उपस्थितांशी संवाद साधून त्यांना लोकशाही प्रक्रियेत योगदान देण्याचे आवाहन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांना मतदार जनजागृतीत योगदान देण्याचे आवाहन केले. या बैठकीस जिल्हाभरातून १५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय