अकोला : दिवाळी आनंदाचा उत्सव आहे. आनंदाची देवाण-घेवाण या उत्सवात केली जाते. या उत्सवाच्या निमित्ताने आनंदाची चौफेर उधळण केली जाते; परंतु हा आनंद आपल्यातच वाटल्यापेक्षा तो जर जे आनंदापासून वंचित आहेत अशा उपेक्षितांच्या दारापर्यंत पोहोचला तर खर्या अर्थाने दिवाळी साजरा केल्याचा आनंद मिळू शकतो. उपेक्षितांचे अंधकारमय जीवन उजळविणे ही खरी दिवाळी आहे. यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा व वंचितांसाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन आपल्या घासातील घास उपेक्षितांसाठी राखून ठेवून त्यांच्यासोबत सोशल दिवाळी साजरी करणार्या अकोला शहरातील विविध सेवाव्रतींनी केले. लोकमतच्यावतीने शुक्रवारी ह्यसोशल दिवाळी : सेवाव्रतींचीह्ण या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीचे संस्थापक प्रा. किशोर बुटोले, स्वराज सामाजिक संस्थेचे पुरुषोत्तम शिंदे, अस्पायरच्या संचालिका प्राजक्ता बुरघाटे व संताजी नवयुवक मंडळाचे अध्यक्ष आनंद चौधरी यांनी सहभाग घेतला. या सर्वच सहभागी वक्त्यांनी आपापल्या संस्थेच्या माध्यमातून सार्जया होत असलेल्या दिवाळीची माहिती दिली, सोबतच समाजाकडूनदेखील सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. समाजातील संवेदना हरवित चालली आहे. आपण आणि आपले कुटुंब एवढय़ापुरतीच र्मयादित राहणार्यांची संख्या वाढत आहे. दिवाळीसारख्या आनंदाची देवाण-घेवाण करणार्या उत्सवात जर आपल्या ताटातील काही भाग उपेक्षितांपर्यंत पोहोचविले तर दिवाळीचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत या वक्त्यांनी व्यक्त केले.
उपेक्षितांचे जीवन उजळविणे हीच खरी दिवाळी
By admin | Updated: October 18, 2014 00:47 IST