शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस सेंद्रिय खताची वाहतूक करणारा ट्रक जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 18:43 IST

पोलिसांनी ट्रकमधील बोगस सेंद्रिय खताच्या १६0 बॅगसह ट्रक जप्त केला.

हिवरखेड: दानापूर-सौंदळा-हिवरखेड रोडवरील वान नदीजवळ बोगस सेंद्रिय खत विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह हिवरखेड पोलिसांनी छापा घातला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. पोलिसांनी ट्रकमधील बोगस सेंद्रिय खताच्या १६0 बॅगसह ट्रक जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.कृषी विभागाच्या अधिकाºयांना मंगळवारी रात्री एमएच २६-एच-८१११ क्रमांकाच्या ट्रकमध्ये बोगस सेंद्रिय खत नेत असल्याची माहिती मिळाली. कृषी विभागाच्या अधिकाºयांनी हिवरखेड पोलिसांसह याठिकाणी छापा घालून ट्रक अडविला आणि ट्रकची तपासणी केली. ट्रकमध्ये प्रत्येकी ५0 किलो वजनाच्या १६0 बॅग असल्याचे दिसून आले. या बॅगांची तपासणी केली असता, त्यावर बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक आणि परवाना क्रमांक आढळून आला नाही. यामधील जिओगीन खत अवैधरीत्या सेंद्रिय खताचे उत्पादन करून विना परवानगी वाहतूक करून विक्री करून शेतकºयांची फसवणूक करीत असल्याचे आढळून आले. तेल्हाºयाचे कृषी अधिकारी मिलिंद ज्ञानदेव वानखडे यांच्या तक्रारीनुसार हिवरखेड पोलिसांनी रणजित प्रतापराव भंडारे(पुणे), में नर्मदा पोल्युशन सर्व्हिसेस पुणे सहकारी साखर कारखाना, बाभूळगाव ता. वसमत जि. हिंगोली आणि गणेश बाबाराव कºहाळे, रा. बोरी सावंत, ता. वसमत, ट्रकचालक किसन मुकुंदराव सावंत, रा. बोरी सावंत, ता. वसमत यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२0, सहकलम खत नियंत्रक आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलमनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ट्रकमधील १ लाख ६ हजार रुपये किमतीच्या खताच्या बॅगा आणि ट्रक असा एकूण १६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कृषी विभागाच्या भरारी पथकासह हिवरखेडचे ठाणेदार आशिष लव्हंगडे, पीएसआय विठ्ठल वाणी, गोपाल दातीर, संतोष सुरवाडे, आकाश राठोड यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी) 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी