बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गवर क्र. ६ वर बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या राजापूर बस थांब्या नजीक महामार्गावरील नादुरुस्त उभ्या ट्रकला एसटी बसने मागून धडक दिल्याची घटना रविवारी रात्री घडली. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले.बोरगाव मंजू कडून मूर्तीजापूरकडे एम. एच. ४० बी.जी. २२३३ हा मालवाहक ट्रक जात असता रविवारी दुपारी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाने तो महामार्गावर उभा करून ठेवला होता. दरम्यान, एम. एच. १४ बी. टी. ४३०३ ही तेल्हारा आगाराची बस नागपूर करीता ४० प्रवासी वाहुन नेत असता रविवारी रात्री दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर बस समोरील नादुरुस्त उभ्या ट्रक वर मागुन धडकली. या अपघातात बसमधील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. या अपघातात बस चे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत दोन जखमींना उपचारार्थ पाठविण्यात आले.
महामार्गावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रक ला बसची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 14:34 IST
राजापूर बस थांब्या नजीक महामार्गावरील नादुरुस्त उभ्या ट्रकला एसटी बसने मागून धडक दिल्याची घटना रविवारी रात्री घडली.
महामार्गावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रक ला बसची धडक
ठळक मुद्दे तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाने तो महामार्गावर उभा करून ठेवला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर बस समोरील नादुरुस्त उभ्या ट्रक वर मागुन धडकली.या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले.