अकोला : मिनी ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत कामगार ठार झाल्याची घटना ६.३0 वाजताच्या सुमारास खडकी रोडवर घडली. खडकीतील धीरज कॉलनीत राहणारे नूरपतसिंह नेमसिंह ठाकूर (५0) हा त्याच्या एमएच ३0 एजे ४५७३ क्रमांकाच्या मोटारसायकलने घरी जात असता, त्यांना समोरून येणार्या एमएच २0 एटी ३१९३ क्रमांकाच्या मिनी ट्रकने जोरदार धडक दिली. यात नूरपतसिंह ठाकूर हे गंभीर जखमी झाले. त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी खदान पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून ट्रक जप्त केला.
ट्रकची धडक; कामगार ठार
By admin | Updated: October 20, 2014 01:43 IST