शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालकानेच रचला २२ लाखांच्या तेलाच्या दराेड्याचा कट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST

भुसावळ येथील रोशन होलाराम सचदेव (वय ३५, रा. भुसावळ) हा ट्रकचालक ४ सप्टेंबर रोजी एस. के. ऑईल मिल जळगाव ...

भुसावळ येथील रोशन होलाराम सचदेव (वय ३५, रा. भुसावळ) हा ट्रकचालक ४ सप्टेंबर रोजी एस. के. ऑईल मिल जळगाव येथून २२ लाख रुपये किमतीचे सूर्यफूल तेल रायपूर येथे घेऊन जात होता. मात्र, चालक रोशन याची नियत बदलल्याने त्याने तेलाचा ट्रक परस्पर इंदूर येथे नेला. तेथे तेलाची विक्री केली व ट्रक मालेगाव येथे औरंगाबाद रोडवर उभा करून थेट बोरगाव मंजू पोलिस ठाणे गाठले व लुटल्याचा बनाव केला. त्यानेच स्वत: पोलिस ठाण्यात रिपोर्ट दिला की, तो हायवेवर नैसर्गिक विधीकरिता थांबला होता. यावेळी एका वाहनातून आलेल्या पाच जणांनी त्याला पकडले. त्यापैकी दोघांनी तीन दिवस डांबून ठेवले. तर दोघे ट्रक घेऊन पळाले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस व बोरगाव मंजूचे पोलिस संयुक्त तपास करीत असताना त्यांना घटना संशयास्पद वाटली. त्यांनी चालकाची सखोल चौकशी केली असता चालकाने ट्रकमालकासोबत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर एसके ऑईल मिलचे प्रदीप बन्सीलाल लाहोटी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला़ या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, गोकुळ चव्हाण, स्वप्निल खेडकर, लीलाधर खंडारे, नफीस शेख व बोरगाव मंजू येथील शरद बुंदे यांनी केला आहे.