शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

ट्रकचालकानेच रचला २२ लाखांच्या तेलाच्या दराेड्याचा कट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 11:02 IST

Truck driver plotted Rs 22 lakh oil scam : २२ लाख रुपये किमतीचे तेल ट्रकचालकाने इंदूरला परस्पर विकले आणि त्याला दरोडेखोरांनी लुटल्याचा बनाव करीत या प्रकरणाची तक्रार पाेलिस ठाण्यात केली़.

अकाेला : जळगाव खान्देश येथून तेलाने भरलेला ट्रक रायपूरला जात असताना २२ लाख रुपये किमतीचे तेल ट्रकचालकाने इंदूरला परस्पर विकले आणि त्याला दरोडेखोरांनी लुटल्याचा बनाव करीत या प्रकरणाची तक्रार पाेलिस ठाण्यात केली़; मात्र या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने काही दिवसातच ट्रकचालकाने रचलेला कट उघडकीस आणला असून त्याने हे तेल इंदूर येथे विकल्याचेही समाेर आले आहे़. आराेपी ट्रकचालकास पाेलिसांनी अटक केली आहे़.

भुसावळ येथील रोशन होलाराम सचदेव (वय ३५, रा. भुसावळ) हा ट्रकचालक ४ सप्टेंबर रोजी एस. के. ऑईल मिल जळगाव येथून २२ लाख रुपये किमतीचे सूर्यफूल तेल रायपूर येथे घेऊन जात होता. मात्र, चालक रोशन याची नियत बदलल्याने त्याने तेलाचा ट्रक परस्पर इंदूर येथे नेला. तेथे तेलाची विक्री केली व ट्रक मालेगाव येथे औरंगाबाद रोडवर उभा करून थेट बोरगाव मंजू पोलिस ठाणे गाठले व लुटल्याचा बनाव केला. त्यानेच स्वत: पोलिस ठाण्यात रिपोर्ट दिला की, तो हायवेवर नैसर्गिक विधीकरिता थांबला होता. यावेळी एका वाहनातून आलेल्या पाच जणांनी त्याला पकडले. त्यापैकी दोघांनी तीन दिवस डांबून ठेवले. तर दोघे ट्रक घेऊन पळाले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस व बोरगाव मंजूचे पोलिस संयुक्त तपास करीत असताना त्यांना घटना संशयास्पद वाटली. त्यांनी चालकाची सखोल चौकशी केली असता चालकाने ट्रकमालकासोबत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर एसके ऑईल मिलचे प्रदीप बन्सीलाल लाहोटी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला़ या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, गोकुळ चव्हाण, स्वप्निल खेडकर, लीलाधर खंडारे, नफीस शेख व बोरगाव मंजू येथील शरद बुंदे यांनी केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला