शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

निर्भयाला श्रद्धांजली; सकल मराठा समाजातर्फे कॅन्डल मार्च

By admin | Updated: July 14, 2017 01:28 IST

कोपर्डी घटनेतील दोषींना शिक्षा द्या : शेकडो समाज बांधवांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोपर्डी येथील निर्भयावर काही नराधमांनी अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या केली. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी सायंकाळी हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौकातील स्व. ब्रजलाल बियाणी यांच्या पुतळ्याजवळून कॅन्डल मार्च काढण्यात आला. कॅन्डल मार्चमध्ये शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाने आरोपींविरुद्ध कडक कारवाई केली नाही. जलदगती न्यायालयात खटला चालवून निर्भयाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे शासनाने आश्वासन दिले होते; परंतु या आश्वासनाचा शासनाला विसर पडला. मृत्यूनंतरही निर्भया आणि तिच्या कुटुंबाला शासनाकडून न्याय मिळाला नाही. कोपर्डी येथील निर्भयावर झालेल्या अत्याचाराला १३ जुलै रोजी वर्ष पूर्ण झाले. अजूनही या घटनेची धग कायम आहे. गुरुवारी सायंकाळी कॅन्डल मार्चचे आयोजन केले होते. कॅन्डल मार्चच्या अग्रस्थानी चिमुकल्या मुलींसह महिला होत्या. कॅन्डल मार्च हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौकातून मार्गक्रमण करीत कोतवाली चौकातील महाराणा प्रताप बागेसमोर आल्यानंतर सकल मराठा समाजाच्यावतीने निर्भयाला आदरांजली अर्पित करण्यात आली. कॅन्डल मार्चमध्ये सकल मराठा समाजातील महिला, युवती, युवक, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.‘कोपर्डी’च्या अत्याचाऱ्यांना त्वरित फासावर लटकवा!- कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करू न तिची अतिशय निर्दयपणे हत्या करण्याच्या घटनेला १३ जुलै रोजी एक वर्षाचा कालावधी झाला आहे; परंतु हे कृत्य करणारे पप्पु शिंदे , संतोष भवाळ, नितीन भैमुले या नराधमांना शिक्षा झाली नाही. - शासनाने सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून त्वरित निकाली काढावा व या तिघांना फाशीचीच शिक्षा मिळावी, अशा आशयाचे निवेदन छावा संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या निवेदनात या खटल्यातील साक्षीदारांना शासनाने पोलीस सरंक्षण द्यावे व कोपर्डी गावातील भीतीचे वातावरण दूर करावे,अशीही मागणी छावाने केली आहे. सदर निवेदन देताना छावाचे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोेडे, प्रसिद्धीप्रमुख प्रदीप खाडे, मनीराम ताले, अविनाश पाटील, रजनिश ठाकरे, सुरेश गाढे, अरविंद कपले, संतोष भिसे, संतोष ढोरे, अमोल पाटील, सुभाष पाटील, बाळासाहेब लाहोळे, गोपाळराव गालट, डॉ. अमोल रावणकर, डॉ. रणजित कोरडे, गजानन पुंडकर, सुनील जानोरकर, चंद्रकांत पाटील, विक्की दांदळे, पीयूष तिरू ख, मंसाराम मेटांगे, अनिरुद्ध भाजीपाले, ब्रम्हा भाकरे,अनिल बोर्डे, मनोहर मांगटे, धनराज लाहोळे, विभा राऊत, भारती देशमुख, रवींद्र मानकर, दिनेश खडसे,अनुराधा कडू,कविता चौधरी, किरण कडू,अलकनंदा खर्चे,अर्चना गावंडे, संगीता देशमुख, वर्षा बडगुजर आदींसह कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.त्वरित निर्णय व्हावा! - महिला राकाँ- अकोला महानगर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कोपर्डी प्रकरणात ताबडतोब निर्णय व्हावा, अशी मागणी केली.- कोपर्डी बलात्कार आणि हत्या तसेच महिला अत्याचारातील आतापर्यंतच्या महाराष्ट्रातील सर्व प्रकरणातील आरोपींवर त्वरित खटले दाखल होऊन त्यांना कठोर शिक्षा दिली जावी, असेही निवेदनात नमूद आहे. यावेळी उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी कोपर्डीतील पीडित निर्भयाला श्रद्धांजली वाहिली. निवेदन देतेवेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता डॉ. आशा मिरगे, महानगर महिला अध्यक्ष मंदा देशमुख, कीर्ती नवलकार, अख्तर बेगम, लीना मोहड, लक्ष्मी बोरकर, माया ठाकूर, नाझमा परवीन, जया शुक्ला, नलिनी भारती, सीमा जाधव, पुष्पा भाकरे आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.