शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात साहित्यीक गंगाधर पानतावणे यांना सर्व संघटनाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 14:21 IST

अकोला : दीनबंधू फोरम, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असो.(डाटा) यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यीक डॉ. गंगाधर पानतावणे यांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन २९ मार्च रोजी सुधाकरराव नाईक महाविद्यालय, अकोला येथील सभागृहात करण्यात आले होते.

ठळक मुद्देप्रारंभी डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून सामूहिक आदरांजली वाहण्यात आली. प्राचार्य डॉ. जयंत बोबडे यांनी डॉ. पानतावणे यांचे उत्तुंग व्यक्तिमत्वाचा परिचय दिला. यावेळी मंचावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

अकोला : दीनबंधू फोरम, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असो.(डाटा) यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यीक डॉ. गंगाधर पानतावणे यांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन २९ मार्च रोजी सुधाकरराव नाईक महाविद्यालय, अकोला येथील सभागृहात करण्यात आले होते. आदरांजली सभेचे अध्यक्ष जेष्ठ आंबेडकरी समीक्षक डाँ. चिंतामण कांबळे, मूर्तिजापूर, हे होते. तर प्रभारी प्राचार्य डॉ.जयंत बोबडे, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी, कवी, विजय दळवी, आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. एम. आर. इंगळे, जेष्ठ साहित्यिक आ. कि. सोनोने, सुप्रसिद्घ लेखक, सुरेश साबळे डॉ. गजानन मालोकार, प्रा. मोहन खडसे, प्रा. प्रदीप चोरे, प्रा. डॉ. गोपाल उपाध्ये, डॉ. भास्कर पाटील, यांची प्रमुख उपस्थिती याप्रसंगी होती.प्रारंभी डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून सामूहिक आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. जयंत बोबडे यांनी डॉ. पानतावणे यांचे पदस्पर्श सुधाकरराव नाईक महाविद्यालयास लाभून येथेच त्यांचे व्याख्यान ऐकण्याची संधी आम्हाला लाभली असे सांगून त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा परिचय दिला. यावेळी मंचावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. लेखक प्रा. शेखर कोरडे, अ‍ॅड. श्रीकृष्ण टोपरे, डॉ. बी. एच. किर्दक, डॉ. दिवाकर कृष्ण आचार्य, राजेंद्र पातोडे, प्रा. प्रदीप चोरे, डॉ. वर्षा सुखदेवे, डॉ. विलास तायडे,कवी विनोद बोरे, कांबळे, विशाल नंदागवळी आदी मान्यवरांनी शोकभावना प्रकट केल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. भास्कर पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ.अशोक इंगळे यांनी केले तर सर्व मान्यवर उपस्थितांचे आभार डॉ. विनोद इंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. जयंत बोबडे, प्रा. कैलाश वानखडे, प्रा. दिवाकर सदांशिव, डॉ. संदीप भोवते, डॉ.अनिल दडमल, प्रा. राहुल माहुरे, प्रा. शेखर कोरडे, माणिक आगळे ,सुधाकरराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला डॉ. विजय शेगावकर, निळूभाऊ इंगळे, बी. गोपनारायण, प्रा. विजय आठवले, प्रा. रवी मोहोड, राहुल इंगळे, डॉ. रवींद्र सदांशीव, प्रा. शाम गवई, संजय कोकाटे, डॉ.विनोद खैरे, कवी प्रकाश बागडे विविध सामाजिक व साहित्यिक संघटनांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :Akolaअकोला