शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ६५ लाख; खड्डे ६२ लाख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 14:52 IST

पावसाळा तोंडावर आला असल्याने प्रलंबित असलेले २ लाख ९२ हजार खड्डे केव्हा तयार होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे १५ जूनपर्यंत विविध यंत्रणांमार्फत ६२ लाख २९ हजार खड्डे तयार करण्यात आले.उर्वरित २ लाख ९२ हजार खड्डे करण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. पावसाळा तोंडावर आला असून, पावसाळ्यात खड्डे तयार करण्याचे काम करता येणार नाही.

अकोला : वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात यावर्षी ६५ लाख ५१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी १५ जूनपर्यंत विविध यंत्रणांमार्फत ६२ लाख २९ हजार खड्डे तयार करण्यात आले असून, उर्वरित २ लाख ९२ हजार खड्डे करण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. पावसाळा तोंडावर आला असल्याने प्रलंबित असलेले २ लाख ९२ हजार खड्डे केव्हा तयार होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात ६५ हजार ५१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ५४ यंत्रणांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. संबंधित यंत्रणांमार्फत जिल्ह्यातील ४ हजार ६० ठिकाणी वृक्ष लागवड करायची आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्ष लागवड करायची आहे. त्यानुषंगाने वृक्ष लागवडीसाठी संबंधित यंत्रणांमार्फत खड्डे तयार करण्याचे काम सुरू आहे. सामाजिक नवीकरण विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार १५ जूनपर्यंत जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत वृक्ष लागवडीसाठी ६२ लाख २९ हजार खड्डे तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित २ लाख ९२ हजार खड्डे तयार करण्याचे काम अद्याप बाकी आहे. पावसाळा तोंडावर आला असून, पावसाळ्यात खड्डे तयार करण्याचे काम करता येणार नाही. त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी अद्याप प्रलंबित असलेले खड्डे तयार करण्याचे काम केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.विभागीय आयुक्तांनी दिला होता ‘अल्टिमेटम’!वृक्ष लागवड अंतर्गत जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वृक्ष लागवडीकरिता खड्डे तयार करण्याचे ३० मेपूर्वी पूर्ण करण्याचा ‘अल्टिमेटम’ विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी गत ११ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत संबंधित यंत्रणांना दिला होता; परंतु जिल्ह्यात २ लाख ९२ हजार खड्डे तयार करण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाforest departmentवनविभाग