शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मानवी विष्ठेची मजुरांकडून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 11:13 IST

विष्ठा नदीच्या काठावरच टोपल्यांनी टाकल्यामुळे दुर्गंधी व प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : बाळापूर नगरपालिकेकडे मलनिस्सारण यंत्र नसल्याने शौचालयांचे टाके खाली करण्यासाठी मजुरांकडून मानवी विष्ठा डोक्यावरून वाहून न्यावी लागत आहे. ही विष्ठा नदीच्या काठावरच टोपल्यांनी टाकल्यामुळे दुर्गंधी व प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.बाळापूर नगर परिषदेने २00२ मध्ये ट्रॅक्टर सोबतच व्हॅक्युम एमटीआर मलनिस्सारण यंत्र आणले; परंतु त्याचा एकदाही उपयोग न झाल्याने लाखो रुपयांचे महत्त्वाचे उपकरण वापरात नाही. त्यामुळे, शहरातील शौचालयांचे टाके उपसण्यासाठी मजुरांना जुंपून टोपल्याद्वारे मानवी विष्ठेची वाहतूक करावी लागत आहे. ही विष्ठा नदी काठावर फेकण्यात येत असल्याने परिसर व नदीचे प्रदूषण होत आहे. शासन एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करून परिसर स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करते; मात्र नगर परिषद प्रशासन शहरातील सर्व घनकचरा नदीकाठावरच टाकत असल्याचे चित्र आहे. या कचऱ्यावरच मानवी विष्ठा फेकण्यात येत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे.शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनुदान देऊन घरोघरी शौचालयांची निर्मिती केली आहे. सेफ्टिक शौचालयांचे टाके लवकरच भरत आहेत. हे टाके खाली करण्यासाठी नगर परिषदेकडे हॅक्युम एमटीआर मलनिस्सारण यंत्र नसल्याने मजुरांच्या माध्यमातून ते खाली करण्यात येतात. हे टाके खाली करण्यासाठी मजूर हातगाडी किंवा जवळ असल्यास डोक्यावर टोपल्यात भरून त्याची वाहतूक करीत आहेत. ही विष्ठा नदीच्या काठावरच टाकण्यात येत असल्याने परिसरात प्रदूषणात वाढ झाली आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  ५५ हजार लोकसंख्येच्या शहरात व्हॅॅक्युम एमटीआर यंत्र नसल्याने नदी काठावर मानवी विष्ठा टाकण्याचे काम माणसाकडून करून घेणे हा गुन्हा आहे. शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन प्रदूषण करीत असलेल्या नगरपालिकेवर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच मानवी विष्ठा डोक्यावरून वाहून नेणे चुकीचे आहे. यावर कडक कारवाई व्हावी.- रमेश लोहकरे,जिल्हा भाजपा सचिव,बाळापूर

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगर परिषदेचे व्हॅक्युम एमटीआर यंत्र नादुरुस्त आहे. त्याचा वापर नसल्याने खराब झाले. शहरातील टाके साफ करण्यासाठी बाहेरून ट्रॅक्टरचे व्हॅक्युम एमटीआर बोलविण्यासाठी नागरिकांना सूचना केल्या. नवीन व्हॅक्युम एमटीआर यंत्र बोलविण्यासाठी सभागृहात चर्चा करून नवीन यंत्र घेण्याची तरतूद करू. नागरिकांनी टाके साफ करण्यासाठी मानवाऐवजी यंत्राचा वापर करावा.- जी.एस. पवार,न.प. मुख्याधिकारी, बाळापूर

टॅग्स :BalapurबाळापूरAkolaअकोला