शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात पोलिस निरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 15:30 IST

अकोला -  जिल्हा पोलिस अधीक्षक एम राकेश कलासगर यांनी मंगळवारी रात्री जिल्ह्यातील ठाणेदारांचे खांदेपालट केले आहे. यासोबतच काही सहायक पोलिस निरीक्षक यांच्याही बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षकानी दिले असून त्यांना तातडीने रुजू होण्याचे सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा पोलिस अधिक्षकांचा आदेशकाही अधिकाऱ्यांनी बुधवारीच पदभार स्वीकारला

- सचिन राऊत

अकोला -  जिल्हा पोलिस अधीक्षक एम राकेश कलासगर यांनी मंगळवारी रात्री जिल्ह्यातील ठाणेदारांचे खांदेपालट केले आहे. यासोबतच काही सहायक पोलिस निरीक्षक यांच्याही बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षकानी दिले असून त्यांना तातडीने रुजू होण्याचे सांगण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या बदलयामध्ये मूर्तिजापूर शहरचे ठाणेदार गजानन पडघन यांची जुने शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून त्यांचे जागेवर प्रदीप देशमुख यांना देण्यात आले आहे. जुने शहरच ठाणेदार विनोद ठाकरे यांना बाळापूर ठाणेदारपदी बदली देण्यात आली आहे. नियंत्रन कक्षातील संजीव राऊत याना अकोट फाईल पोलीस ठाण्याचे ठाणेदारकी देण्यात आली असून तिरुपती राणे यांना बार्शीटाकळी पोलीस स्टेशन च्या ठाणेदारपदी बदली देण्यात आली आहे. चानींचे वादग्रस्त ठाणेदार वैभव पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून गजानन खारडे यांना चांनी पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे. बार्शी टाकळी चे ठाणेदार सतीश पाटील यांची जुने शहर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पिंजरचे ठाणेदार सुनील साळुंके यांची सिविल लाईन्स पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर नंदकिशोर नागलकर यांना बदली देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षत कार्यरत असलेले प्रेमानंद कात्रे यांची रामदास पेठ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी पातूर पोलिस स्टेशनमध्ये बदली झालेले प्रकाश झोडगे यांची पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या काही अधिकाऱ्यांनी बुधवारीच पदभार स्वीकारला असून कामकाजस सुरुवात केली आहे.वादात सापडलेले अधिकारीबदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये चांनीचे वैभव पाटील हे अनेक प्रकरणामध्ये वादग्रस्त ठरले आहेत, यामध्ये नव्यानेच घडलेले महिला हत्याकांड, पत्रकारांना बंदूक दाखवणे यासारख्या प्रकरणात वादग्रस्त ठरले आहेत, तर प्रेमानंद कात्रे हिवरखेडला असताना गोमांस जप्ती प्रकरणात वादग्रस्त ठरले होते, तिरुपती राणे  यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचीन्ह निर्माण झाले होते.

टॅग्स :Policeपोलिस