अकोला: जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत कर्मचार्यांच्या बदल्यांचा पोळा फुटणार आहे. त्यासाठी समुपदेशनाद्वारे कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया बुधवार, १३ मे पासून सुरू करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सोमवारी करण्यात आले. जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांतर्गत कार्यरत वर्ग -३ आणि वर्ग-४ मधील कर्मचार्यांच्या बदल्या १५ मे २0१४ च्या शासन निर्णयानुसार समुपदेशनाद्वारे करण्याचे निर्देश शासनामार्फत जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विविध ११ विभागांतर्गत कर्मचार्यांच्या १0 टक्के प्रशासकीय व १0 टक्के विनंतीवरून बदल्या करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या आदेशानुसार कर्मचार्यांच्या बदल्यांचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सोमवारी करण्यात आले. त्यानुसार १३ ते १५ मे या तीन दिवसांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या रार्जषि शाहू महाराज सभागृहात समुपदेशनाद्वारे कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या बदल्यांचा फुटणार पोळा
By admin | Updated: May 12, 2015 01:39 IST