शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या शिक्षकांना बदल्यांचे वेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 14:03 IST

घराजवळ असणाऱ्यां अपेक्षित शाळेत बदली करून घेण्यासाठी चक्क लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देघराजवळ असणाऱ्या शाळेत मागील १५-१५ वर्षांपासून काही शिक्षकांनी ठाण मांडले होते. अपेक्षित शाळेवर बदली करून घेण्यासाठी व झालेली बदली थांबवण्यासाठी सर्रासपणे आर्थिक व्यवहार पार पडत होते. २०१७ मध्ये एकाच शाळेवर पाच ते दहा वर्षांपर्यंत कार्यरत राहणाºया ७४ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.

- आशिष गावंडे

अकोला : महापालिक ा शाळेसाठी विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबविण्याच्या नियोजनाला बाजूला सारत काही कामचुकार शिक्षकांना बदल्यांचे वेध लागले आहेत. घराजवळ असणाऱ्यां अपेक्षित शाळेत बदली करून घेण्यासाठी चक्क लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. बदलीच्या माध्यमातून स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्यासाठी शिक्षण विभागाला खतपाणी घालण्याचे काम मनपातील एक वरिष्ठ अधिकारी करीत असल्याने पुन्हा एकदा शिक्षण विभागात बेबंदशाही निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.शहरातील खासगी कॉन्व्हेंटच्या महागड्या शिक्षणाला पर्याय म्हणून महापालिकेच्या शाळांकडे पाहिल्या जाते. कधीकाळी मनपाच्याच शाळेमधून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनी पुढे यशाचे झेंडे रोवल्याचे कोणीही नाकारत नाही. यादरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शिक्षक व शिक्षक संघटनांच्या मनमानीला आवार घालण्याची जबाबदारी असणाºया शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेण्याच्या नादात संघटना व शिक्षकांना रान मोकळे करून देताच महापालिकेच्या शिक्षण प्रणालीला घरघर लागल्याचे चित्र आहे. घराजवळ असणाऱ्या शाळेत मागील १५-१५ वर्षांपासून काही शिक्षकांनी ठाण मांडले होते. अपेक्षित शाळेवर बदली करून घेण्यासाठी व झालेली बदली थांबवण्यासाठी सर्रासपणे आर्थिक व्यवहार पार पडत होते. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके यांनी २०१६ मध्ये पहिल्यांदा एकाच ठिकाणी ठाण मांडणाºया शिक्षकांच्या बदल्या केल्या. २०१६ मध्ये १५ ते २० वर्षांपासून एकाच शाळेत कार्यरत असणाºया ७६ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये एकाच शाळेवर पाच ते दहा वर्षांपर्यंत कार्यरत राहणाºया ७४ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यंदा मनपा आयुक्त जितेंद्र वाघ निकषानुसार बदली करणार की नाही, याबद्दल संभ्रम असला तरी प्रशासनाने यापूर्वी केलेल्या बदल्या रद्द करून पुन्हा अपेक्षित शाळांमध्ये रूजू होण्यासाठी काही शिक्षकांना वेध लागले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका