शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

टोइंग पथकाने उचलल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या गाड्या

By admin | Updated: July 7, 2017 01:40 IST

रेल्वे स्थानक : शाब्दीक चकमकीनंतर खाली उतरवल्या गाड्या

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रेल्वे स्थानकावर खासदार संजय धोत्रे हे प्रवाशांचा जनता दरबार घेत असताना टोइंग पथकाने रेल्वे स्थानक परिसरातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मोटारसायकली उचलल्या. गाड्या खाली उतरवण्याच्या मुद्यावरून कंत्राटदाराच्या माणसांनी मुजोरी केली. खासदार, आमदार आणि महापौरांसमोर कंत्राटदाराची माणसे आणि ट्रॅफिक पोलिसांनी नियम धाब्यावर बसविल्याने येथे वीस मिनिटे शाब्दीक चकमक झाली. कारवाई फसल्याची जाणीव टोइंग पथकाला झाल्याने त्यांनी जप्त केलेल्या सर्व गाड्या खाली उतरवल्या. या निमित्ताने सत्तापक्षातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना टोइंग पथकाची किती दादागिरी आहे याचा अनुभव गुरुवारी आला.रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या समस्या समजून घेण्यासाठी खासदारांनी गुरूवारी प्रवाशांच्या समस्या जाणनू घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी भाजपामधील अनेक पदाधिकारी रेल्वे स्थानकावर जमले होते. या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मोटारसायकली स्थानकाच्या समोरच्या बाजूला ठेवल्या होत्या. भाजप पदाधिकारी रेल्वे स्थानकाची पाहणी करीत खासदारांसमवेत रेल्वे स्थानकाच्या दुसऱ्या दादऱ्यावरून उतरून खाली आले. तेवढ्यात भाजप पदाधिकाऱ्यांना टोइंग पथक गाड्या उचलताना दिसलेत. पदाधिकाऱ्यांच्या गाड्या उचलून एमएच ३० एबी ३४८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये टाकल्या जात असल्याचे पाहून या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कारवाई थांबविण्याचे सांगितले. मात्र, ट्रकमध्ये बसलेल्या ट्रॅफिक पोलिसासह कंत्राटदाराच्या माणसांनी मुजोरी करत दूचाकी उचलण्याचा प्रकार सुूरच ठेवला. हा सर्व प्रकार खासदार, आमदार, महापौर आणि पदाधिकाऱ्यांसमोर घडत होता. कंत्राटदाराची माणसांसोबतची वादावादी वाढल्याने अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करीत हा प्रकार थांबविला व सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाड्या खाली उतरवण्यात आल्या.‘जीआरपीएफ’च्या हद्दीत शहर वाहतूक शाखा कशी?अकोला रेल्वे स्थानक परिसरातून मोटारसायकल चोरीला गेली, तर शहरातील पोलीस विभाग आपल्या ठाण्याची हद्द दाखवून तक्रार स्वीकारत नाहीत. तेव्हा सीमेचा नियम दिसतो आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस टोइंग पथकाला घेऊन जेव्हा हे पोलिस रेल्वेस्थानक परिसरातील मोटारसायकली उचलतात, तेव्हा नियम कुठे जातो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहतूक शाखा- महापालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरात होणारी टोइंग पथकाची दादागिरी वाहतूक नियंत्रणापेक्षा अकोलेकरांना बळजबरी लुटणारीच सिद्ध होत असतानादेखील येथील लोकप्रतिनिधी त्याबद्दल ब्र शब्द काढत नाहीत, याचे नवल वाटते.