शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पंदेकृविचे ग्रामीण उद्योजकता प्रशिक्षण; कडधान्य प्रक्रिया उद्योग उभारणीवर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 16:22 IST

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने ग्रामीण भागात उद्योजकतेसाठी शेतकऱ्यां ना कडधान्य प्रक्रिया उद्योगासाठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

ठळक मुद्देशुक्रवारी कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांना कडधान्य प्रक्रिया या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचे उद्घाटन या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.

अकोला : राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योगावर लक्ष देण्यासाठी अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने ग्रामीण भागात उद्योजकतेसाठी शेतकऱ्यांना कडधान्य प्रक्रिया उद्योगासाठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमातून आतापर्यंत अनेक गावात शेतकरी व महिला बचत गटांनी प्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत.शुक्रवारी कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांना कडधान्य प्रक्रिया या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचे उद्घाटन या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू तसेच बिलासपूर छत्तीसगढच्या इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. ए. के. साहू, संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी डॉ. भाले यांनी ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक परिस्थितीमध्ये बदल घडविण्यासाठी शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग निर्मितीची गरज असल्याचे अधोरेखित केले. त्यासाठी कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला असून, कृषी प्रक्रिया उद्योगांचे तंत्रज्ञान अनेक गावांत उपलब्ध करू न दिले आहे. डॉ. बोरकर यांनी तंत्रज्ञानाबाबत जागरू कता निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. शेतीत उत्पादन घेण्यासोबतच शेतातील कच्च्या मालावर कमी खर्चात प्रक्रिया केल्यास उत्पन्नामध्ये भर पडते. त्यासाठी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. नागदेवे यांनी कौशल्य विकसित व्हावे व जास्तीत जास्त प्रक्रिया उद्योग उभे राहून शेतकरी सक्षम व्हावा, असे प्रयत्न आहेत. म्हणूनच कडधान्य प्रक्रिया तंत्रज्ञान व कडधान्य प्रक्रिया प्रशिक्षण फायद्याचे असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ