शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

तीन राज्यांतील २७० प्रशिक्षणार्थी तरुण अडकले ‘लॉकडाऊन’मध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 11:45 IST

अकोला शहरातील खडकी भागात शनिवारी त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

अकोला: एका कंपनीच्या मार्केटिंग प्रशिक्षणासाठी तीन महिन्यांपूर्वी तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळ या तीन राज्यांतून अकोल्यात आलेले २७० प्रशिक्षणार्थी तरुण ‘लॉकडाऊन’मध्ये अडकले असून, जिल्हा प्रशासनामार्फत अकोला शहरातील खडकी भागात शनिवारी त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.एका कंपनीच्या मार्केटिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी तेलंगणा, आंध्र प्रदेश व केरळ या तीन राज्यांतील २७० तरुण तीन महिन्यांपूर्वी अकोला शहरात आले होते. अकोल्यातील खडकी भागात एका डुप्लेक्समध्ये राहून ते मार्केटिंग प्रशिक्षण घेण्याचे काम करीत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले असून, राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आल्यानंतर तीन राज्यांतील संबंधित प्रशिक्षणार्थी तरुणांनी आपापल्या गावी परत जाण्यासाठी २७ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली; परंतु राज्यभरात लागू करण्यात आलेली संचारबंदी आणि जिल्ह्यातील सीमा बंद करण्यात आल्याच्या स्थितीत प्रशासनाकडून संबंधित तरुणांची गावी परत जाण्याची मागणी अमान्य करण्यात आली. ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेल्या तीन राज्यांतील या प्रशिक्षणार्थी तरुणांची जिल्हा प्रशासनामार्फत २८ मार्च रोजी अकोल्यातील खडकी भागात निवासाची व्यवस्था करण्यात आली. तसेच स्वयंसेवी संस्थांकडून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.वैद्यकीय पथकाने केली आरोग्य तपासणी!अकोला महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकामार्फत २८ मार्च रोजी अकोल्यात अडकलेल्या तीन राज्यांतील संबंधित २७० तरुणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.१६ फ्लॅटमध्ये केली निवास व्यवस्था!‘लॉकडाऊन’मध्ये अकोल्यात अडकलेल्या तीन राज्यांतील २७० तरुण प्रशिक्षणार्थी तरुणांची जिल्हा प्रशासनामार्फत अकोल्यातील खडकी भागात १६ फ्लॅटमध्ये निवास व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक फ्लॅटमध्ये तीन याप्रमाणे १६ फ्लॅटमध्ये २७० जणांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे.एका कंपनीच्या मार्केटिंग प्रशिक्षणासाठी तीन महिन्यांपूर्वी अकोल्यात आलेल्या तीन राज्यांतील २७० तरुणांनी गावी परत जाण्याची मागणी केली; मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये संबंधित तरुणांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. अकोल्यातील खडकी भागात त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.-विजय लोखंडे,तहसीलदार, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थी