शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर  बाजार समितीमधील एक कोटीचा माल घेऊन खरीददार पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 14:21 IST

मूर्तिजापूर: तीन महिन्यांपूर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांचे सोयाबीन खरेदी करून वर्धा येथील खरीददार महारोशनी ट्रेडिंग कंपनीचा मालक कैलास अजाबराव काकड हा अडत्यांचे ८० लाख २६ हजार ३९८ रुपयांचे धान्य खरेदी करून पसार झाला आहे.

- संजय उमक 

मूर्तिजापूर: तीन महिन्यांपूर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांचे सोयाबीन खरेदी करून वर्धा येथील खरीददार महारोशनी ट्रेडिंग कंपनीचा मालक कैलास अजाबराव काकड हा अडत्यांचे ८० लाख २६ हजार ३९८ रुपयांचे धान्य खरेदी करून पसार झाला आहे. या कारणासाठी अडत्यांनी गत शुक्रवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धन्य बाजार बेमुदत बंद ठेवला आहे.वर्धा येथील महारोशनी ट्रेडिंग कंपनीचा मालक कैलास काकड यांनी मूर्तिजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांचा तीन महिन्यांपूर्वी सोयाबीन माल खरेदी केला होता. या संदर्भात येथील अडत्यांनी पैशाची मागणी केली; परंतु अडचण समजून न घेता उडवाउडवीची उत्तरे अडत्यांना देण्यात आली. आतापर्यंत अडत्यांनी कैलास काकड यांना ८० लाख २६ हजार ३९८ रुपयांचा माल दिला. त्या पोटी अडत्यांना काकड यांच्याकडून बाकी घेणे होते. आजपर्यंत अडत्यांनी शेतकऱ्यांना स्वत:च्या खिशातून पैशाचे चुकारे केले; परंतु अडत्यांचे १ कोटीच्या जवळपास पैसे अडकून पडल्याने शेतकºयांचा माल खरेदी करण्यासाठी अथवा शेतकºयांना देण्यासाठी पैसे नसल्याने अडत्यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य खरेदी बेमुदत बंद ठेवली आहे. सोमवारी २८ अडते वर्धा येथे गेले असता रिकाम्या हाताने परत आले. यापुढे उपरोक्त खरीददारावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय येथील अडत्यांनी घेतला असल्याचे समजते.१० फेब्रुवारी रोजी अडते आणि खरीददार यांची बैठक घेण्यात आली. या प्रकरणात बाजार समिती अडत्यांच्या पाठीशी असून, त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे; परंतु हा वाद अडते आणि खरीददार यांच्या मधला आहे. तरीसुद्धा समिती अडत्यांना योग्य सहकार्य करेल. बैठकीमध्ये येत्या बुधवारपासून धान्य बाजार नियम सुरू करण्यात असल्याचा निर्णय झाला आहे.- रितेश मडगे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, मूर्तिजापूरवर्धा येथील खरीदार कैलास काकड यांनी आमचा सोयाबीन माल खरेदी करून मालाचे पैसेच दिले नसल्याने आमचा अडते वर्ग आर्थिक अडचणीत आला आहे. यामुळे शेतकºयांना पैसे देण्याची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे धान्य बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे पैसे मिळाले नाही तर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात येईल.- प्रकाश सोमाणी, अडते, कृषी उत्पन्न बाजार समिती, मूर्तिजापूर

 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरMarket Yardमार्केट यार्ड