शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सावकारांच्या जाचाला कंटाळून आडत व्यापाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 14:31 IST

दहिगाव गावंडे येथीलच भास्कर रामचंद्र गावंडे याच्याकडून श्रीकृष्ण गावंडे यांनी २०१४ मध्ये दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते.

अकोला -अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या विघ्नेश्वर अडत दुकानचे मालक श्रीकृष्ण बाकेराव गावंडे ( ५५) यांनी दहीगाव येथीलच रहिवासी असलेल्या दोन सावकारांच्या जाचाला कंटाळून मोठी उमरी येथे गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. त्यांच्यावर दहिगाव गावंडे येथे अंत्यसंस्कार पार पडले. अवैध सावकार बाबुराव गावंडे व त्याचा साथीदाराच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.मुळचे दहिगाव गावंडे येथील श्रीकृष्ण गावंडे यांची अकोल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विघ्नेश्वर नावाने अडत दुकान आहे. ते अकोल्यात उमरीमध्ये प्रकाश सावरकर यांच्या घरी भाड्याने राहत होते. दहिगाव गावंडे येथीलच भास्कर रामचंद्र गावंडे याच्याकडून श्रीकृष्ण गावंडे यांनी २०१४ मध्ये दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. रकमेची परतफेड केल्यानंतरही भास्कर गावंडे हा व्याजाचे अव्वाचे सव्वा रुपये त्यांना पैसे मागतच होता. तर भास्कर गावंडेचे चुलतभाऊ बाबुराव रामभाऊ गावंडे व साहेबराव रामभाऊ गावंडे हे त्यांना पैसे दे नाही तर जीवाने मारू अशा धमक्या देत होते. सततच्या धमक्यांना त्रस्त होवून श्रीकृष्ण गावंडे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली, अशी तक्रार श्रीकृष्ण गावंडे यांच्या पत्नी अरुणा यांनी सिव्हिल लाइन्स पोलिसांना दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भास्कर रामचंद्र गावंडे, बाबुराव रामभाऊ गावंडे, साहेबराव रामभाऊ गावंडे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या