शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

असंघटित बांधकाम कामगारांच्या घरकुलांसाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 20:05 IST

शासनाच्या अनेक योजना आहेत, त्याचा लाभ बांधकाम कामगारांनी घ्यावा, असे आवाहन करून असंघटीत बांधकाम कामगारांच्या घरकुलांसाठी गावठाण जमिन मिळण्याकरीताही निश्‍चित प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची ग्वाही बांधकाम कामगारांसाठी नोंदणीचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला -असंघटीत बांधकाम कामगार हा बांधकाम आणि त्या अनुषंगाने  विविध क्षेत्रात सातत्याने राबत असतो, अशा कामगारांच्या व त्यांच्या  कुटुंबियांच्या कल्याणासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, त्याचा लाभ या  कामगारांनी घ्यावा, असे आवाहन करून असंघटीत बांधकाम कामगारांच्या  घरकुलांसाठी गावठाण जमिन मिळण्याकरीताही निश्‍चित प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, सहाय्यक  कामगार आयुक्त आणि अनुलोम, अग्निपंख व थॅलेसीमीया सोसायटी यांच्या  संयुक्त विदयामाने बांधकाम व्यवसाय व त्या अनुषंगाने इतर काम करणा-या  बांधकाम कामगारांसाठी नोंदणीचा मेळावा प्रमिलाताई ओक सभागृहात आज  पार पडला. त्या निमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. पाटील  बोलत होते. महापौर विजय अग्रवाल, थॅलेसीमीया सोसायटीचे अध्यक्ष  हरीषभाई अलीमचंदानी, मनपा उपायुक्त डॉ. पाटील, अग्नीपंख बहुउदेदशीय  संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, उर्जा पर्व फाउंडेशनचे संजय तिकांडे,  सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक बोरकर, नेहरु युवा केंद्राचे  उदय देशमुख हे व्यासपीठावर उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, संघटीत कामगारांना विविध योजनांचा नेहमीच लाभ  मिळतो, परंतु वेगवेगळया बांधकाम क्षेत्रात सातत्याने कामाच्या माध्यमातून  योगदान देणा?्या असंघटीत बांधकाम कामगारांसाठीही शासनाच्या अनेक  योजना कार्यान्वित आहेत. लग्न, प्रसुती, मुलांचे शिक्षण, व्यवसाय उभारणी,  विमा सुरक्षा, पेन्शन यासाठी अनेकविध योजनांव्दारे कामगारांना सहकार्य केले  जाते, त्यामुळे असंघटीत बांधकाम कामगारांनी निराश होण्याचे कारण नाही.  सर्व योजनांचा लाभ त्यांनी घ्यावा. याशिवाय कौशल्य विकासाच्या माध्यमातून  आपल्या क्षेत्रात निपुण असल्याचे प्रमाणपत्रही दिले जाईल, जेणेकरुन या  प्रमाणपत्राच्या माध्यमातून त्यांना बाहेर देशातही चांगल्या वेतनावर काम मिळू  शकेल.    महापौर विजय अग्रवाल म्हणाले की, असंघटीत बांधकाम  कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून कामगार कल्याण  मंडळाबरोबरचे महानगर पालिकाही झटत असते. मनपाकडून या कामगारांना  नोंदणी केल्यानंतर दोन दिवसांत नोंदणीचे प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच  वेळोवेळी मार्गदर्शनही केले जाईल.श्री. अलीमचंदानी म्हणाले की, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी  असंघटीत बांधकाम कामगारांनी कामगार कार्यालयाकडे नोंदणी अवश्य  करावी. या कामगारांच्या कल्याणासाठी शासन सदैव कटीबध्द आहे. प्रास् ताविकात डॉ. ओळंबे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे  आवाहन असंघटीत बांधकाम कामगारांना केले. श्री. बोरकर यांनी महाराष्ट्र  इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातंर्गत नोंदीत बांधकाम  कामगारांसाठी सुरु असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. विविध  योजनांच्या लाभार्थ्यांचा याप्रसंगी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते  गौरव करण्यात आला. आभार श्रीकांत एखंडे यांनी मानले. यावेळी मोठया सं ख्येने कामगारांची उपस्थिती होती. अनेक कामगारांनी यावेळी नोंदणी केली. 

टॅग्स :Dr.Ranjit Patilडॉ.रणजीत पाटीलAkola cityअकोला शहर