अकोला : होळी, धूलिवंदन व शिवजयंती उत्सवाच्या पृष्ठभूमीवर शहरात कायदा व सुव्यस्था कायम राखण्यासाठी विविध गुन्हे दाखल असलेल्या शहरातील ६२ गुन्हेगारांना तीन दिवस शहरातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी गुरुवारी दिला. प्रतिबंधात्मक कलम १४४ नुसार विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या ६२ गुन्हेगारांना ५ ते ८ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत शहरातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश एसडीओंनी दिला. त्यामध्ये डाबकी रोड पोलीस ठाणे अंतर्गत चार, आकोटफैल पोलीस ठाणे अंतर्गत १0, जुने शहर पोलीस ठाणे अंतर्गत नऊ, सिव्हिल लाइन्स पोलीस ठाणे अंतर्गत २६ व रामदासपेठ पोलीस ठाणे अंतर्गत १३ अशा एकूण ६२ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.
अकोला शहरातील ६२ गुन्हेगार तडीपार
By admin | Updated: March 6, 2015 02:18 IST