शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्ण वृद्धेवर अत्याचार; आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 11:58 IST

अजमत शहा ऊर्फ अज्जा तयब शहा हा नको त्या अवस्थेत दिसला. त्याने त्या वृद्ध महिलेच्या वेडसरपणाचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : ६० वर्षीय मनोरुग्ण वृद्धेवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अजमत शहा ऊर्फ अज्जू तयब शहा (३० रा. अडगाव खु.) याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.अडगाव खु. येथील आॅटो चालक नंदकिशोर महादेव घोंगे यांनी ११ डिसेंबर २०१६ रोजी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अडगाव खु. ते अकोट रोडवर एक वेडसर व अनोळखी वृद्ध महिला दिसायची. या महिलेला नंदकिशोर घोंगे हे खाद्यपदार्थ खायला द्यायचे. १० डिसेंबर २०१६ रोजी सायंकाळी त्या वृद्धेसाठी खाद्यपदार्थ घेतले आणि घोंगे हे गावातील काही लोकांसह अडगाव खुर्द फाट्यावर गेले; परंतु फाट्यावर ही वृद्ध महिला दिसली नाही़ त्यामुळे घोंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वृद्धेचा शोध घेतला असता, रोडच्या दुसºया बाजूला गावातील अजमत शहा ऊर्फ अज्जा तयब शहा हा नको त्या अवस्थेत दिसला. त्याने त्या वृद्ध महिलेच्या वेडसरपणाचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.घोंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी अजमत शहा यास पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो पळून गेला. घोंगे यांच्या तक्रारीनुसार अकोट ग्रामीण पोलिसांनी आरोपी अजमत शहा याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२)(जे)(एल) नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने एकूण १५ साक्षीदार तपासले. आरोपी अजमत शहा याच्याविरुद्ध साक्ष व सबळ पुरावे असल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ अजित देशमुख यांनी बाजू मांडली. लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळासाहेब नाईक यांनी केला होता. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटCrime Newsगुन्हेगारी