शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अकोला  जिल्ह्यात तूर खरेदीचे दीड महिन्यापासून अडकले चुकारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 15:36 IST

अकोला : ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यात गत दीड महिन्यात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अद्याप करण्यात आले नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांवर १८ एप्रिलपर्यंत ५५ कोटी ९० लाख रुपयांची १ लाख २ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.३ मार्चपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे ३० कोटी रुपयांचे चुकारे गत ३१ मार्च रोजी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत करण्यात आले ४ मार्च ते १८ एप्रिलपर्यंत या दीड महिन्याच्या कालावधीत खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे २६ कोटी रुपयांचे चुकारे अद्याप करण्यात आले नाही.

अकोला : ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यात गत दीड महिन्यात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अद्याप करण्यात आले नाही. दीड महिन्यांपासून चुकारे अडकल्याने, विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे केव्हा मिळणार, याबाबत तूर उत्पादक शेतकºयांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दराने जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, पिंजर, पातूर, वाडेगाव व पारस इत्यादी सात केंद्रांवर गत २ फेबु्रवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांवर १८ एप्रिलपर्यंत ५५ कोटी ९० लाख रुपयांची १ लाख २ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यापैकी गत ३ मार्चपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे ३० कोटी रुपयांचे चुकारे गत ३१ मार्च रोजी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत करण्यात आले; परंतु गत ४ मार्च ते १८ एप्रिलपर्यंत या दीड महिन्याच्या कालावधीत ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे २६ कोटी रुपयांचे चुकारे अद्याप करण्यात आले नाही. तूर खरेदीचे चुकारे दीड महिन्यापासून रखडल्याने लग्नसराई आणि शेती मशागतीच्या काळात विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे मिळणार तरी केव्हा, याबाबत तूर उत्पादक शेतकºयांकडून प्रतीक्षा केली केली जात आहे.खरेदी बंदच; ४० हजार शेतकरी तूर मोजमापाच्या प्रतीक्षेत!‘नाफेड’च्या आदेशानुसार जिल्ह्यातील सातही खरेदी केंद्रांवर गत १८ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात आली. खरेदी अद्याप बंदच असल्याने तूर खरेदीसाठी ‘आॅनलाइन’ नोंदणी केल्यानंतर जिल्ह्यात ४० हजार शेतकºयांच्या तुरीचे मोजमाप रखडले आहे. त्यामुळे खरेदी केव्हा सुरू होणार आणि नोंदणी केलेल्या तुरीचे मोजमाप केव्हा होणार, याबाबत तूर उत्पादक शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर १८ एप्रिलपर्यंत ५५ कोटी ९० लाख रुपयांची १ लाख २ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यापैकी गत ३ मार्चपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे करण्यात आले असून, ४ मार्च ते १८ एप्रिलपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे होणे अद्याप बाकी आहे.-राजेश तराळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती