शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांचा अहवाल अमान्य; महापौरांनी दिले पुनर्तपासणीचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 13:06 IST

अकोला : मनपा उपायुक्त सुमंत मोरे यांनी थातूरमातूर सादर केलेला शौचालय तपासणीचा अहवाल अमान्य असल्याचे सांगत या प्रकरणाची पुनर्तपासणी ...

अकोला: मनपा उपायुक्त सुमंत मोरे यांनी थातूरमातूर सादर केलेला शौचालय तपासणीचा अहवाल अमान्य असल्याचे सांगत या प्रकरणाची पुनर्तपासणी करण्याची मागणी शुक्रवारी मनपाच्या स्थगित सर्वसाधारण सभेत नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, बाळ टाले, गिरीश गोखले तसेच काँग्रेस नगरसेवक पराग कांबळे यांनी लावून धरली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महापौर विजय अग्रवाल यांनी पुनर्तपासणीचे निर्देश दिले असता, एक महिन्यात सखोल चौकशी करून अहवाल सभेसमोर सादर करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी दिले.केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत ‘जिओ टॅगिंग’ न करताच शौचालये उभारण्यात आली. यावर २९ कोटींचा खर्च केला असता, आॅडिट करणे गरजेचे होते का, असा सवाल भाजप नगरसेवक अजय शर्मा यांनी उपस्थित केला. त्यावर आयुक्त संजय कापडणीस यांनी ‘जिओ टॅगिंग’आणि आॅडिट या दोन्ही बाबी अपेक्षित असल्याचे सांगितले. याप्रकरणी उपायुक्त सुमंत मोरे यांनी कागदोपत्री चौकशी करून सादर केलेला अहवाल मान्य नसल्याची भूमिका भाजप नगरसेवक तसेच काँग्रेसचे पराग कांबळे यांनी लावून धरली.झोन अधिकाºयांना सर्व्हेचे निर्देशशौचालय घोळाची पुनर्तपासणी करण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिल्यानंतर आयुक्त संजय कापडणीस यांनी चारही झोन अधिकाºयांना झोननिहाय सर्व्हे करण्याचे निर्देश दिले. आरोग्य निरीक्षकांकडे तसेच मनपातसुद्धा शौचालय बांधकामाचे दस्तऐवज उपलब्ध असून, त्यानुषंगाने तपासणी करा, चौकशीसाठी अपेक्षित सर्व मुद्यांवर नगरसेवकांसोबत चर्चा करून अहवाल सादर करण्याचे फर्मान आयुक्तांनी जारी केले.२५ वर्षांपासून सभागृहात; कारवाई नाहीच!प्रशासनाने मालमत्ता पुनर्मूल्यांकनाच्या निविदेत चूक केल्यामुळे मनपाच्या तिजोरीवर वार्षिक दीड कोटींचा नाहक बोजा पडणार आहे. यावर महालेखाकार समितीने आक्षेप नोंदविला. मी मागील २५ वर्षांपासून सभागृहात असलो तरी महालेखाकार समितीच्या आक्षेपांवर कधीच कारवाई झाली नाही. यावेळी ती व्हावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ नगरसेवक हरीश आलिमचंदानी यांनी व्यक्त केली.‘आॅडिट’ ही निरंतर प्रक्रियामहालेखाकार समिती तसेच औरंगाबाद येथील लेखाकार समितीकडून दरवर्षी मनपाच्या आर्थिक कामकाजाचे लेखापरीक्षण केले जाते. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. टॅक्सची निविदा नियमानुसार पार पडल्याचे दिसते. लेखापरीक्षणातील चुका दुरुस्त करून शासनाकडे अनुपालन अहवाल सादर करावा लागतो, अशी माहिती मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी दिली.

आॅडिटमध्ये आक्षेप; कारवाई करा!महालेखाकार समितीने रिलायन्सला तीन कोटी रुपये माफ करण्यावर आक्षेप नोंदविला आहे, तसेच मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करताना मनपाने प्रकाशित केलेल्या निविदेत जाणीवपूर्वक विविध बाबींचा अंतर्भाव करून १ लाख ४५ हजार मालमत्तांवर वर्षाकाठी नाहक १ कोटी ४० लाख रुपये खर्च होतील. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी काँग्रेस नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी लावून धरली. ‘आॅडिट’संदर्भात नगरसेवक अजय शर्मा, गिरीश गोखले यांनीही हलगर्जीपणा करणाºयांवर कारवाईची मागणी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका